Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीछत्रपती संभाजी महाराज गणेश मंडळाची मिरवणूक उत्साहात

छत्रपती संभाजी महाराज गणेश मंडळाची मिरवणूक उत्साहात

म्हासुर्णे : म्हासुर्णे येथील छत्रपती संभाजीराजे महाराज गणेश मंडळाची उत्साहात मिरवणूक सुरु झाली. या मंडळाची मिरवणूक अतिशय साध्या पध्दतीने काढण्यात आली. डॉल्बी बंदी असल्यामुळे या वर्षी मंडळाने पर्यावरण संतुलन राहण्यासाठी साध्या पध्दतीने गणपती बाप्पा मोरया घोषणा देवुन मिरवणूक काढुन या मंडळाने गावा समोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून या मंडळाचे कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे या मंडळातील बहुसंख्य सदस्य हे मुस्लीम समाजातील असुन या समाजातील सदस्यांनी अतिशय सुंदर आशा पध्दतीने 11 दिवस गणेश उत्सव पुजा चांगल्या पध्दतीने करुन हिंदु-मुस्लीम असा भेदभाव न करता हम सभ भाई भाई अशा पध्दतीने गणेश उत्सव साजरा करुन गणेश विसर्जन मध्ये मोठया संख्येने सहभागी होवुन मिरवणूकीला सुरूवात केली.
हिंदुबांधवानी आणि मुस्लीम बांधवांनी ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे उदारण जगापुढे ठेवले आहे असा स्तुत्य उपक्रम छत्रपती संभाजी राजे गणेश मंडळाने समाजासमोर ठेवला आहे.आणि 1983 साली गणेशोत्सव व मोहरम हे दोन्ही सण एकत्र आले होते.बरोबर 36 वर्षानंतर हे दोन्ही सण पुन्हा एकत्र आले होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular