Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीजोडप्यांना लुटणार्‍या आरोपीना अटक; मुद्देमाल हस्तगत

जोडप्यांना लुटणार्‍या आरोपीना अटक; मुद्देमाल हस्तगत

फलटण : नाईकबोंबवाडी येथील तातमगिरी डोंगरावर जोडप्यांना लुटलेल्या आरोपीना अटक व चोरीस गेलेले सोन्याचे ऐवज फलटण व बारामती येथील अनोळखी चोरांकडून हस्तगत केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की दि. 20 ऑगस्ट 2011 रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास नाईकबोंबवाडी, ता. फलटण गावचे हद्दीतील तातमगीरी डोंगरावर तातमगीरी देवाचे दर्शन घेण्यासाठी पती-पत्नी गेले असता तातमगीरी डोंगराचे पायथ्याला अनोळखी तीन चोरट्यांनी त्यांना मारहाण करून त्यांचे जवळील 15 हजार रुपये रोख रक्कम, एक ओपो कंपनीचे मोबाईल तसेच फिर्यादीचे पत्नी हीचे अंगावरील सोन्याचे गंठण, मणीमंगळसुत्र, गळ्यातील दुशी, कानातील रिंगा व सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण 15 हजार रुपये किमतीचा माल बळजबरीने चोरी नेला.
सदर गुन्हा उघडकीस आणणेकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सूचना दिल्या होत्या. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे नितीन सावंत यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक बोबले यांनी केलेला असून सदर गुन्ह्यात बारामती, फलटण तालुक्यातील अनोळखी आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे गंठण, मणिमंगळसुत्र, कानातील रिंगा व सॅमसंग कंपनीचा मोबाईल असे जप्त केले आहे. तसेच त्यांची अधिक माहिती घेऊन इतर ठिकाणी ते गुन्ह्यात आहेत का याची माहिती पोलीस घेत आहेत.
सदर कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक बांबले, सहा. फौजदार सुर्यवंशी, पो.ह.वा. 396 हांगे, शिंदे , पोकॉ. जगदाळे, पोकॉ पाटोळे, पो.ना. तुपे, पोकों नरबट यांनी सहभाग घेतला होता. तर ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी असे चोरटे असून त्यांच्या शोध घेतला जाणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular