म्हसवड : माण तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या नलिनी कोळी यांची भारतीय जनता पार्टीच्या माण तालुका युवती प्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आले आहे.
माण तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या नलिनी दत्तात्रय कोळी यांची माण तालुका युवती प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून या निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टीच्या युवती प्रमुख विभागाच्या जिल्हाध्यक्षा मोनिका धायगुडे यांनी दिले आहे.
यावेळी धायगुडे यांनी नलिनी कोळी यांनी भाजप पक्षा साठी प्रामाणिकपणे काम केले असून समाजशीलता, सामाजिक बांधिलकी जोपासत आदर्श काम केले आहे. असून या पुढील काळात त्यांच्या कडून युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक चांगले काम अशी अपेक्षा असल्याचे सांगितले, तर नलिनी कोळी यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी पुर्ण क्षमतेने पार पाडणार असल्याचे सांगितले.
त्यांच्या या निवडीबद्दल कोळी महासंघाचे अध्यक्ष आ. रमेशदादा पाटील, मेजर दत्तात्रय कोळी, आण्णासाहेब कोळी, सुभाषराव पाटील, भाऊसाहेब पाटील, पोपट बनसोडे-पाटील, अजित पाटील, व माण तालुका भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान या निवडीबद्दल सौ.नलिनी कोळी यांचा सत्कार प्रेरणा मतिमंद मुलांचे प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रच्या वतीने उपाध्यक्ष दत्तात्रय कोळी, गब्बर काझी, सुशांत तवटे यांनी केला.
भाजपा माण तालुका युवती प्रमुखपदी नलिनी कोळी यांची निवड
RELATED ARTICLES