Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीकराड नगरपालिका नगरवाचनायातर्फे नवरात्र उत्सवात शारदीय व्याख्यानमालचे आयोजन

कराड नगरपालिका नगरवाचनायातर्फे नवरात्र उत्सवात शारदीय व्याख्यानमालचे आयोजन

कराड: नगरपरिषदेच्या नगरवाचनालयाच्यावतीने प्रतिवर्षी शारदीय व्याख्यानमालेचा उपक्रम राबविला जातो. सन 1932 पासुन ही व्याख्यानमाला अविरतपणे सुरू असुन यंदा ही शारदीय व्याख्यानमालेस प्रारंभ होत आहे. कराचे सांस्कृतिक, वैचारिक वैभव, शैक्षणिक संस्कारक्षम व्यासपीठ, म्हणुन या व्याख्यानमालेने नावलौकिक मिळविला आहे.
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयंत पाटील, मुख्याधिकारी यशवंत पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, व सर्व नगरसेवकांचे सहकार्य या शारदीय व्याख्यानमालेस लाभत आहे.
162 वर्षाची परंपरा जपणारे हे नगरावाचनालय आज कराड शहराची शान भरली आहे बुध्दीवंतांची गरज तर वाचनवेडया पुस्तकप्रेमी वाचकप्रेमी वाचकांची तहान भागविण्याचा झरा बनली आहे. या वाचनालयाची स्थापना 1857 ची हे वर्षच मुळात अखंड भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि संस्मरणीय वर्ष. या 1857 मध्ये स्थापन झालेले हे नगरवाचनालय आजही आपल्या अखंड सेवेने, तत्परतेने, विविधतेने,वाचकांची, जिज्ञासूंची, अभ्यासूंची व्याख्यानमाला रसिकांची भूक भागविते आहे.
या व्याख्यानमालेत साहित्य, संगीत, कला, क्रीडा, लोककला राजकारण, काव्य, कथाकथन, धार्मिक अध्यात्मिक, इत्यादी विविध विषयावरील व्यासंगपुर्ण अभ्यासु व नामवंत वक्त्यांनी गेल्या 161 वर्षात 700हुन अधिक व्याख्यात्यांनी आपली व्याख्याने सादर केलेली आहेत. या थोर विचारवंताचे विचार कराडकरांच्या चिरंतर स्मृतीत कायमचे राहिले आहेत.
आजपर्यंत या शारदीय व्याख्यानमालेबरोबरच कराड नगरपरिषदेचे सार्वजनिक ग्रंथालय एक पुरस्काराने सन्मानित झालेले हे ग्रंथालय या शारदीय व्याख्यानमालेच्या रूपाने एक सांस्कृतिक वारसा जोपासत आहे. व्याख्यानमालेस श्रोत्यांची गर्दी असते.
कराडला येवुन शारदीय व्याख्यानमालेत आपली हजेरी लावण्यातही वक्त्यांना आपला गौरवच वाटतो, म्हणुन नामवंत वक्तेही या शारदीय व्याख्यानमालेत सहभागी होण्यास उत्सुक असतात.
रविवार दिनांक 29 ऑक्टोंबर 2019 रेाजी व्याख्यानमालेचा शुभारंभ पुणे अकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम अधिकारी निलिमा पटवर्धन या नवरात्र महात्म्य या व्याख्यानाने होणार आहे. सोमवार दि.30 सप्टेंबर रोजी एम.के.सी.एल चे मॅनेजिंग डायरेक्टर विवके सावंत, पुणे, यांचे भारताची ज्ञानयुगात झेप मंगळवार दि.1 ऑक्टोंबर रोजी कौलव ता.राधानगरी येथील हास्यसम्राट संभाजी यादव याचे हसण्यासाठी जगा अन जगण्यासाठी हसा बुधवार दि.2 ऑक्टोंबर रेाजी सांगली येथिल नेत्ररोग तज्ञ दिलीप पटवर्धन, यांचे जीवन जगणे कला गुरूवार दि.3 ऑक्टोंबर रोजी चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी यांचे भारतीय राज्य घटनेतील कलम 370 शुक्रवार दि.4 ऑक्टोंबर रोजी गिरिश कुबेर, ठाणे यांचे महासत्ता म्हणजे काय शनिवार दि. 5 ऑक्टोंबर रोजी पुना प्रिव्हेंटिव्ह काडिओलॉजी सेंटरच्या संचालिका डॉ. ज्योत्स्ना पाटील, पुणे यांचे आपणही हदयरोग टाळू शकतो रविवार दि.6 ऑक्टों. रोजी सांगली येथील साहित्यिक नामदेव माळी यंाचे मुल वाढवायची की घडवायची सोमवार दि.7 ऑक्टो. रोजी प्रसिध्द व्याख्याते व साहित्यिक संजय कळमकर, अहमदनगर याचे हसायदान अशाप्रकारे एकुण 9 व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत.
या सर्व व्याख्यानास कराडच्या रसिक श्रौंतृवृंदानी, विद्यार्थीवर्गानी बहुसंख्येने उपस्थित राहुन त्याचा लाभ घ्यावा, अशी विनंती नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, व सर्वनगरसेवकांनी केली आहे.
वरील सर्व व्याख्याने यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन टाऊन हॉल येथे दररोज सायं. 6.30 वाजता होणार आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular