Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडी...तर निवडणूक लढणार नाही: उदयनराजे

…तर निवडणूक लढणार नाही: उदयनराजे

* पवारांच्या आठवणीने उदयनराजे गहिवरले * पुन्हा धक्कातंत्राचा अनुभव *

सातारा: माजी खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या आठवणीने भावनावश झाले. पवारांनी खरचं लोकसभा निवडणूक लढवावी म्हणजे मी हिंडायला मोकळा, ते लढणार असतील तर माझी माघार आहे असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी करत पुन्हा धक्कातंत्राचा अनुभव दिला.
सातारा लोकसभेची पोटनिवडणूक मंगळवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे यांच्या जल मंदिर निवासस्थानी राजकीय हालचाली सुरू झाल्या. सुरवातीला निवडणूक आयोगाची अधिसूचना केवळ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर राजे समर्थकांनी उदयनराजे यांच्या भेटीसाठी जलमंदिर येथे गर्दी करायला सुरवात केली. उदयनराजे यांच्या संपर्क कार्यालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठले आणि शरद पवारांच्या संदर्भाने उदयनराजे यांना बोलते केले ते म्हणाले, शरद पवार हे आम्हाला नेहमीच वडिलधारी आहेत.स्व. प्रताप सिंह महाराजानंतर पवारांकडूनच आम्हाला वडीलकीची माया मिळाली ते जर पोटनिवडणूक लढवणार असतील तर मी फॉर्मच भरणार नाही, असे म्हणताना उदयनराजे यांचा आवाज कातर झाला आणि क्षण काळ त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.ते योग्य उमेदवार आहेत त्यांनी सातार्‍यातून लढावे म्हणजे मी इथे निवांत हिंडायला मोकळा. शेवटी स्टाईल इज स्टाईल म्हणत उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपली कॉलर उडविली.
उदयनराजे यांच्या या पवित्र्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, पवारांचे आणि उदयनराजे भोसले यांचे अत्यंत आपुलकीचे नाते आहे.
भाजप ने राजकीय खेळी करून उदयनराजे यांना आपल्या गोटात खेचले. उदयनराजे भोसले यांनी पक्षबांधणीत सहकार्य करत महाराष्ट्राचे नेतृत्व करावे अशी पवारांची इच्छा होती. पवारांनी सातार्‍याची पोटनिवडणुक लढवायची की नाही हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. उदयनराजे जर माघार घेऊन राज्यसभेवर जाणार असतील व सातार्‍याची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असेल तर आम्ही शरद पवारांना आग्रह करू असे शिंदे यांनी बोलताना सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular