फलटण: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचा भंग करीत बेकायदा जमाव जमवून रॅली काढून व्यापार्यांची दुकाने बंद केली या प्रकरणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातिल विद्यमान आमदार दीपक प्रल्हाद चव्हाण यांचेसह विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्या वर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल बुधवार दि.25 रोजी 10.30 ते 11.10 च्या सुमारास नाना पाटील चौक, शिवाजी चौक,आंबेडकर चौक, उमाजी नाईक चौक, गजानन चौक, राम मंदिर, बादशाही मस्जिद, शिवशक्ती चौक, डेक्कन चौक या भागात आमदार दीपक प्रल्हाद चव्हाण रा.तरडगाव ता.फलटण, विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर रा.फलटण, मिलिंद राजाराम नेवसे रा.मोती चौक फलटण यांनी तसेच यांच्या सोबत 40/50 लोक सर्व रा.फलटण जि. सातारा यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीर जमाव जमवून रॅली काढून व्यापार्यांना दुकाने बंद करा असे म्हनून आदर्श आचारसंहितेचा भंग केला तसेच जिल्हाधिकारी सातारा यांचेकडील जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश क्र. डीसी/एम.एजि/2/एस. आर./10/2018 दि.3-4-2018 तसेच क्र. डी. सी./एम.एजी./2/एस.आर./33/2019 जिल्हाधिकारी सातारा दि.13-9-2019 अन्वये आदेशाचा भंग केला आहे म्हणून वरील सर्वांची तक्रार पोलीस हवालदार सतीश दडस यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास ए .एस. आय. भोईटे करीत आहेत.
आचारसंहिता भंग प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
RELATED ARTICLES