म्हसवड : म्हसवड येथील दहिवडे मळा येथील गणेश दहिवडे हा माणगंगा नदीतील बंधार्यात पडला असून त्याचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. परंतु पाणी जादा शोधकार्यात अडथळा येत होता.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, म्हसवड येथील रथ ग्रहाजवळून माणगंगा नदीपालिकडे असणार्या दहिवडे मळ्याकडे गणेश दहिवडे वय 40 वर्षे हा दुपारच्या वेळेस निघाला होता. जात असताना तोल जाऊन तो पाण्यात पडला.पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. तो बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांनी शोध मोहीम सुरू केली. परंतु त्याठिकाणी पाणी जास्त असल्याने शोध मोहिमेस अडथाळे येत होते. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम चालू होती.
माणगंगेच्या बंधार्यात युवक बुडाला
RELATED ARTICLES