Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीयुवराज जाधववर मोक्कांतर्गत कारवाई

युवराज जाधववर मोक्कांतर्गत कारवाई

सातारा: कोर्ट व जेलमध्ये सहकार्य केल्याप्रकरणी 3 लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या गुंड दत्ता व त्याचा भाउ युवराज जाधव या भावांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहेे. शहर पोलिसांनी पोलिस अधीक्षक व तेथून पुढे आयजी कार्यालयाला प्रस्ताव पाठवला असता त्याला मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, दत्ता जाधव सध्या मोक्कात असून आता त्याच्या भावाचीही मोक्कामध्ये उचलबांगडी झाली आहे. चार दिवसांपूर्वी अनिल कस्तुरे याला गुंड दत्त जाधव याने जेलमधून चिठ्ठी लिहून ती चिठ्ठी त्याचा भाउ युवराज जाधव याला दिली. या चिठ्ठीमध्ये दत्ता जाधव याने अनिल कस्तुरे याला मदत केल्याप्रकरणी 3 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. गेल्या दोन वर्षापासून अनिल कस्तुरे याला दोघे भाउ चिठ्ठी, समोरासमोर येवून पैशाची मागणी करत होते. याप्रकरणी संशयितांनी दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकीही दिली होती.
दिवसेंबदिवस कस्तुरे याला त्रास देवू लागल्याने अखेर त्याने चार दिवसांपूर्वी खंडणीची तक्रार दिली. खंडणीची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करताच त्याचा मोक्काचाही प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव पोनि प्रदीपकुमार जाधव यांनी तयार करुन तो पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवला. पोलिस अधीक्षक कार्यालयातून तो कोल्हार परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे पाठवल्यानंतर त्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular