Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीजिल्हा बँकेच्या संचालकपदी शिवरुपराजे निंबाळकर-खर्डेकर

जिल्हा बँकेच्या संचालकपदी शिवरुपराजे निंबाळकर-खर्डेकर

सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरील कृषि पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया संस्था, कृषि उत्पादन प्रक्रिया सहकारी संस्था (सहकारी साखर कारखाने, ऑईल मिल्स्, सुत गिरण्या इ . या मतदार संघातील रिक्त झालेली जागा भरणेसंबंधी बँकेच्या संचालक मंडळाची सभा संपन्न झाली.संचालक पदासाठी एकच अर्ज आलेने शिवरुपराजे यशवंतराव निंबाळकर-खर्डेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर झाले.
बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, संचालक राजेंद्र राजपुरे, दत्तात्रय ढमाळ, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, अर्जुनराव खाडे, प्रदिप विधाते, वसंतराव मानकुमरे, संचालिका कांचन साळुंखे, सुरेखा पाटील व अन्य मान्यवर संचालक सदस्य तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, व्यवस्थापक, अधिकारी यांनी नवनिर्वाचित संचालक यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या .
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने म्हणाले, नावलौकिक प्राप्त बँकेचे संचालक म्हणून शिवरुपराजे यशवंतराव निंबाळकर-खर्डेकर यांची निवड झालेली असून ही अत्यंत आनंदाची बाब आहे. बँकेचे जेष्ठ संचालक कै.दादाराजे खर्डेकर यांचे बँकेच्या कामकाजात मोलाचे योगदान असून ते अत्यंत अभ्यासू व मनमिळावू होते. दादाराजे खर्डेकर यांचेप्रमाणेच, समाजाच्या उन्नतीसाठी व कल्याणासाठी तसेच सभासद हिताचे चांगले कामकाज करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. बँकेच्या संचालकपदी निवड झालेबद्दल संचालक मंडळाचेवतीने अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
बँकेचे नवनिर्वाचित संचालक शिवरुपराजे यशवंतराव निंबाळकर-खर्डेकर यांनी संचालकपदी निवडीबद्दल मा.आ.श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर व सर्व संचालक सदस्यांनी कामकाज करणेची संधी दिलेबद्दल आभार मानून ऋण व्यक्त केले.
दादाराजे खर्डेकर यांना बँकेच्या कामकाजाविषयी अत्यंत अत्मीयता व तळमळ होती व ते सर्वसामान्यांचे हितासाठी सदैव आग्रही होते . संचालक म्हणून सर्वसामान्य शेतकरी सभासदांचे उन्नतीसाठी व बँकेच्या हितासाठी चांगले कामकाज करणेसाठी प्रयत्नशील राहीन. माझेवर ज्या विश्वासाने संचालक पदाची जबाबदारी टाकलेली आहे त्या विश्वासास कोणताही तडा जावू न देता, बँकेचे राजकारणविरहीत कामकाज करणेचे पध्दतीची परंपरा कायम राखणेचा प्रयत्न केला जाईल . बँकेच्या नावलौकिकास कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सांगून सर्वांचे सहकार्यामुळे बँकेची भविष्यात अधिक प्रगती होईल असे आश्वासन दिले व सर्वांचे आभार मानून ऋण व्यक्त केले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य व नावलौकिक प्राप्त बँकेच्या संचालकपदी शिवरुपराजे यशवंतराव निंबाळकर-खर्डेकर यांची निवड झालेबद्दल अभिनंदन केले व म्हणाले, दादाराजे खर्डेकर यांनी आमच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांवर मनापासून प्रेम केले. त्यांची बँकेबद्दल अपार निष्ठा होती.
नम्र, सुस्वभावी, प्रामाणिक व मनमिळाऊ मार्गदर्शक आमच्यात नसल्याने बँकेचे फार मोठे नुकसान झालेचे डॉ. सरकाळे यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेसाठी बँकेचे संचालक सदस्य, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा, सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे . उपस्थित संचालक महोदय यांचे आभार मानले .

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular