मल्हारपेठ : मल्हारपेठ परिसरात दुर्गा मातेचे उत्साहात स्वागत करणेत आले. श्री निनाई देवी, श्री नवसरी देवी, श्री जानाई देवी यांच्या मंदिरातही नवरात्र उत्सवला दिमाखात प्रारंभ झाला आहे.सर्वच देवदेवतांच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
विविध सार्वजनिक नवरात्र मंडळांनीही भक्तिमय वातावरणात दुर्गा मातेचे स्वागत केले आहे. मल्हारपेठच्या जयमल्हार मंडळाने कोल्हापूर च्या आंबा माता मंदिरातून दुर्गा ज्योत आणली आहे. आकर्षक मंडप सजावट व बहूसंख्य महिलांच्या उपस्तीतीत दुर्गा मातेचे आगमन झाले. मल्हारपेठच्या नवतरुण मंडळाने गिरेवाडीच्या संत तुकाराम वारकरी शिक्षण संस्थेचे भजनी मंडळचा वारकरी दिंडीचे खास आकर्षण ठेवले होते. ह.भ.प. अमोल महाराज व ह.भ.प. नवनाथ महाराज यांचेसह वारकरी शाळेतील तीस विध्यार्थ्यांनी या दिंडीत सहभाग घेतला होता. मल्हारपेठ च्या विठ्ठल मंडळाने ही ढोल ताशाच्या गजरात दुर्गा मातेचे स्वागत केले.
हर हर महादेव मंडळाने ही पारंपरिक पद्धतीने दुर्गा मातेचे स्वागत केले आहे. दिनडुकलेवादी येथेही भक्तीमय वातावरणात दुर्गा मातेचे स्वागत केले. मल्हारपेठ परिसरात घरोघरीही घट स्थापना करून नवरात्र उत्सवाला दिमाखात सुरुवात झाली आहे. सर्वत्र पहाटे व सायंकाळी आरती रात्री टिपरी रास दांडिया तसेंच अनेक उपक्रमनचेही आयोजन केले आहे.
मल्हारपेठ परिसरात नवरात्र उत्सवाला दिमाखात प्रारंभ
RELATED ARTICLES