Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीमाजी नगरसेवकांच्या निषेधार्थ पालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

माजी नगरसेवकांच्या निषेधार्थ पालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

सातारा : पालिकेच्या आरोग्य निरीक्षकाला दमदाटी व शिविगाळ करणार्‍या माजी नगरसेवकांच्या निषेधार्थ पालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. संबधितांनी माफी मागितल्याशिवाय कामावर परतणार नाही असा पवित्रा कामगारांनी घेतल्याने नगराध्यक्षांसह सर्व पदाधिकार्‍यांना त्यांची मनधरणी करण्याची वेळ आली.
नगरसेविका सीता हादगे यांचे पती माजी नगरसेवक राम हादगे यांचे व आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे यांची त्यांच्या वॉर्डात फॉगिंग होत नाही या तक्रारीवरून जोरदार खडाजंगी शुक्रवारी दुपारी झाली होती. हादगे यांनी काय गुडे यांना अपशब्द वापरत दमदाटी केल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला. सोमवारी दोनशे वीस कर्मचार्‍यांनी सोमवारी पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केल्याने शहरातील सफाईचे काम ठप्प झाले. नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक निशांत पाटील, पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, आरोग्य सभापती विशाल जाधव, शिवसेनेचे नेते नरेंद्र पाटील, व संघटनेचे कर्मचारी उपस्थित होते. संबधितांकडून नेहमीच कामाच्या वेळेला त्रास दिला जातो. त्यांना तातडीने समज देण्यात यावी व त्यांनी कर्मचार्‍यांची माफी मागावी अशी मागणी नगरपालिका कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली. नगराध्यक्ष माधवी कदम यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. प्रकरण फार वाढवू नका आचारसंहितेचा कालावधी सुरू आहे. संबंधितांना समज देण्यात येईल कोणतेही काम वाद न होता समन्वयाने होतील अशी थेट ग्वाही नगराध्यक्षांनी दिल्यावर कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन मागे घेतले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular