पाटण -जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांचा पाटण तालुक्यातील बहुजण समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करुन भिडे यांचेवर पोलिस प्रशासनाकडून त्वरित कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन समाजाच्या वतीने पाटणचे तहसिलदार श्री रवींद्र माने व सहा. पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना देण्यात आले,
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय थोरवडे, प्राणलाल माने, आनंदा कांबळे, दिपक भोळे, संजय कांबळे, संजय डूबल, विकास हादवे उपस्थित होते,
या निवेदनात म्हटले आहे की, सांगली येथे दुर्गा माता दौड या कार्यक्रमास शिवप्रतिष्ठाणचे अध्यक्ष मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त राष्ट्र संघातील वक्तव्यावर बोलताना म्हणाले की देशाचे पंतप्रधान चुकीचे बोलत असून हि चुक महाराष्ट्र दुरूस्त करु शकतो. ते काम आपले आहे, भारताने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध काही उपयोगाचा नाही विश्वाचा संसार सुखाचा करण्यासाठी संभाजी महाराज, शिवाजी महाराज, त्याहुन पुढे भगवान श्रीकृष्ण पाहिजेत असे वादग्रस्त विधान करून विश्वाचे शांततेचे प्रतिक असलेल्या भगवान बुद्धांचा अवमान करुन सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे, यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत,आम्हास छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल नितांत आदर आहे, या पूर्वी या व्यक्तीने अशीच वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. वारंवार अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे दोन समाजात विनाकारण वाद निर्माण होण्याची शक्यता आहे,या वक्तव्याची पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संभाजी भिडे यांचेवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर समाजातील प्रमुख कार्यकत्यांच्या सह्या आहेत.
भिडे गुरुजींच्या वादग्रस्त वक्तव्याचा पाटण येथे बहुजन समाजाच्या वतीने निषेध.
RELATED ARTICLES