पाटण:- पाटण विधानसभा मतदार संघामध्ये पाटणकर विरोधी देसाई गट ही रणधुमाळी पारंपारिक असताना महाराष्ट्रामध्ये कुठेही सत्तेमध्ये नसणारा मनसे पक्ष आगामी विधानसभा निवडणूकांच्या रणांगणामध्ये उतरून या पक्षाने पाटण मतदार संघात मनसे इंजिन सोडले आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपले उमेदवार मनसे ने दिली असून पाटण विधानसभा मतदार संघात तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांच्या नावाची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत पाटण विधानसभा मतदार संघातून मनसेचं इंजिन धावणार आहे हे नक्कि.
पाटण विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूकिचे रान तापू लागले असताना अनेक हौसी गवशी उमेदवारांची ही चांगलीच रेलचेल सुरु झालेली आहे. अशातच मनसेचे इंजिन पाटण विधानसभा मतदार संघात धावणार असल्याने सर्वसामान्य जनतेतील चेहरा मनसे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर हे या निवडणुकीसाठी सज्ज आहेत. गोरख नारकर मनसे पक्षनिर्मितीपासून पक्षाचे खंदे कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत. विधानसभा रणांगणामध्ये पक्षाकडून त्यांच्या नावाची चर्चा असल्याने त्यांचा नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटण तालुक्यामध्ये व मुंबईवासी मनसे सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाटण मतदार संघामद्ये देसाई विरुद्ध पाटणकर निवडणूक रंगात आलेली असताना वर्षानुवर्ष च्या घराणेशाहीला फाटा देण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील नवा चेहरा जनतेसमोर येनं गरजेचं आहे. गोरख नारकर सर्वपक्षिय लोकांशी मित्रत्वाचे संबंध असणारा चेहरा आहे. गोरगरिब जनतेला आपुलकी असणारे व लोकांच्या हाकेला सदैव तप्तर असणारे व्यक्तिमहत्व आहे. मनसेच्या उमेदवारीने आमच्यावरती काही फरक पडणार नाही असे समजणाऱ्यांनी अंतर्गत मताधिक्य कमी करण्याचे काही अंशी काम हा उमेदवार करणार आहे.
मनसेची उमेदवारी गांभिर्याने न घेता चालणार नाही कारण. मनसे चा सध्याचा बोलाबाला अन स्थानिक उमेदवाराचे तळागळात राहून काम करण्याची पध्दत यामुळे मोठ्या प्रमाणात मताधिक्य मनसे आपल्या कडे शाबूत ठेऊ शकते. मनसे तालुक्यातील काही अंशी मताधिक्य आपल्याकडे वळवून हम भी किसीसे कम नही हे दाखवू देईल.