Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीआ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब

3 आक्टोंबरला उमेदवारी अर्ज भरणार
कराड : सातारा लोकसभेच्या रिक्त झालेल्या जागेवरून मी निवडणुक लढवावी असा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आग्रह धरला होता. मी माझी भुमिका काँगे्रस पक्षश्रेष्ठींकडे मांडली होती. त्यानंतर मी कार्यकर्त्यांची भुमिका विचारून पक्षश्रेष्ठींना त्यांचे मत कळविले. त्यानुसार मित्र पक्षाशी चर्चा होवुन सातारा लोकसभा मतदार संघातुन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यंाच्या नावावर एकमत झाले. व मला कराड दक्षिण विधानसभा निवडणुक लढविण्याचे कळविण्यात आले आहे. तंेंव्हा माझा उमेद्वारी अर्ज 3 आक्टोंबरला भरणार असल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण यंानी स्पष्ट केले. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
सातारा लोकसभेची पोट निवडणुक की कराड दक्षिण विधानसभा हा आ. पृथ्वीराज यांच्या उमेद्वारी बद्दल संभ्रम निर्माण झाला होता. आघाडीने जिल्हयातील उमेद्वार निश्‍चित केले. मात्र कराड दक्षिणबाबत निर्णय झाला न्हवता. उमेंद्वारी कोठुन करावी या बाबत बाबांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्यात उपस्थीत सर्वांनीच कराड दक्षिणाचा आग्रह धरला. हा निर्णय पक्षश्रेष्टींना कळविल्या नंतर काँगे्रेस व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यंामध्ये सातारा लोकसभेसाठी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या नावावर एक मत झाल्याने कराड दक्षिण विधानसभेच्या निवडणुकीबाबतचा तिढा सुटला आता मी दक्षिणेतुनच विधान सभेची निवडणुक लढविणार असल्याचे आमदार चव्हाण यंानी स्पष्ट केले. येत्या 3 ऑक्टोंबर रोजी उमेद्वारी अर्ज दाखल करणार असुन त्याच दिवशी जाहिर सभेचे आयोजन केले असल्याचे ते म्हणाले.
होणारी निवडणुक जनतेच्या पोटापाण्याच्या प्रश्‍नावर लढणार आहोत. असे सांगून आ. चव्हाण म्हणाले राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंानी मागील निवडणुकीत उमेद्वारी अर्ज भरताना खोटी माहिती भरली होती. या विरूध्द त्यांच्यावर सुप्रीम कोर्टात खटला दाखल झाला होता. त्याचा निकाल नुकताच लागला आहे. त्यात सुप्रीम कोर्टाने मुख्यमंष्यंाना दोषी ठरवुन सदरचा खटला स्थानिक न्यायालयात वर्ग करण्याचे निर्देश दिले असल्याचेही चव्हाण म्हणाले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular