Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीसातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांचे नाव निश्‍चित

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांचे नाव निश्‍चित

सातारा : काही दिवसापासून घडत असलेल्या घडामोडींनंतर अखेर सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे आता भाजपच्या उदयनराजे यांचे विरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील अशी रंगतदार लढत जिल्ह्याला पहावयास मिळणार आहे.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काही दिवसापूर्वी श्रीनिवास पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यानंतर अचानक पृथ्वीराज चव्हाण हे उदयनराजे विरोधात निवडणूक लढवतील अशा चर्चा होऊ लागल्या. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केली. आघाडीकडून अपेक्षित बोलणी न झाल्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेचाच अर्ज भरणार असल्याचे सोमवारी जाहीर केले होते. त्यामुळे आज मंगळवारी सकाळी शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. गुरुवार दि. 3 रोजी पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. श्रीनिवास पाटील यांनी कराड लोकसभा मतदार संघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. तसेच ते सिकिमचे राज्यपाल ही होते. जिल्हयात श्रीनिवास पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
शरद पवारांच्या खास मर्जीतील असणार्‍या पाटलांना सहा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या केडरचा मोठा पाठिंबा आहे. काँग्रेसच्या नेत्यांशी सुद्धा पाटील यांचे जवळचे मैत्री संबंध आहेत. त्यामुळे सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांच्या विरुध्द पवारांनी पाटलांचे हुकमी कार्ड काढले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular