Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीस्त्री म्हणजे सर्वंकष सामर्थ्याचे केंद्रस्थान: रवि वसंत सोनार

स्त्री म्हणजे सर्वंकष सामर्थ्याचे केंद्रस्थान: रवि वसंत सोनार

पंढरपूर: प्रत्येक स्त्री ही तिच्या जीवनातील मुलगी, बहिण, मैत्रीण, पत्नी, आई, सासू, आजी आणि इतर सर्वच जबाबदार्‍या सक्षमपणे आणि समर्थपणे पार पाडत असते. म्हणूनच या जगतातील स्त्री म्हणजे सर्वंकष सामर्थ्याचे केंद्रस्थान आहे. असे मत येथील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव नोंदविलेले विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते सोलापूर येथील श्री महालक्ष्मी समाजसेवी व संशोधन न्यास (रजि.) यांच्या माध्यमातून कवी सोनार यांना त्यांच्या आजपर्यंतच्या बहुरंगी, बहुढंगी, वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण साहित्य लेखन व सेवेमुळे सन्मानचिन्ह, महावस्त्र, पुष्पहार आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी गौरव पुरस्कार 2019 च्या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले ज्याप्रमाणे स्त्री ही सर्व जबाबदार्‍या समर्थपणे पार पाडत असते त्याचप्रमाणे प्रत्येक नातेसंबंधात स्नेहरुपी धाग्याची गुंफण करत असते. म्हणूनच की काय आईच्या भूमिकेत असणारी प्रत्येक स्त्री ही प्रेमाचा आगर असते, अमृत सागर असते.
मोहन श्रीपती धुमाळ, मा. संजय नामदेव जाधव, मा. हणमंत तुळशीराम मोतीबने, मा. धानय्या सिद्रामप्पा स्वामी आणि मा. दत्तात्रय अप्पासाहेब लाळसंगी या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते देण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी गौरव पुरस्कार सोहळ्याप्रसंगी कवी रवि सोनार यांनी नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून आईचा महिमा वर्णन करणार्‍या महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या रचना सादर केल्या.
कवी सोनार यांच्या काही सुश्राव्य आणि सुमधूर रचना ऐकून उपस्थित श्रोत्यांचे मन मंत्रमुग्ध झाले होते. तर काही रचना ऐकून उपस्थित श्रोत्यांना गहिवरून येवून डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.
लक्षणीय व प्रचंड प्रमाणात महिलांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमाची सुरुवात गायक अक्षय जंगलगी यांच्या सुमधूर स्वागत गीत आणि देशभक्तीपर गीताने झाली.
कवी रवि सोनार व त्यांच्या सुविद्य पत्नी सविता रवि सोनार यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी देवीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सचिव हनमंत मोतीबने यांनी केले. तर अध्यक्ष मोहन धुमाळ यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष संजय जाधव, सहसंचिव दत्तात्रय लालसंगी, खजिदार धानय्या स्वामी, स्वच्छता अभियान प्रमुख भानुदास सुर्यवंशी, तसेच श्री महालक्ष्मी समाजसेवी व संशोधन न्यास (रजि.) सोलापूर या संस्थेच्या राघवेंद्र नगर आणि रामनारायण चंडक विहार या परिसरातील अबालवृद्ध स्त्री पुरुष सदस्यांनी विशेष अथक परिश्रम घेतले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular