औंध: औंध पोलीसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून अवैध्य दारु साठा व चारचाकी वाहनासह सुमारे एक लाख पासष्ट हजार रुपयांचा ऐवज औंध पोलिसांनी जप्त केला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुसेसावळी ते वडूज रस्त्यावर अवैध्यरित्या दारु वाहतूक एकजण करीत असल्याची खबर औंध पोलीसांना मिळाली यावेळी पळशी ते पुसेसावळी मार्गावर पोलिसांनी पाळत ठेवली असता पुसेसावळी कडून वडूजकडे निघालेली इंडीका गाडी क्रमांक चक इऊ 5251 पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता गाडीमध्ये बारा हजार चारशे ऐंशी रुपये किंमतीच्या सुमारे 240 दारूच्या बाटल्या आढळल्या. याप्रकरणी मोहसीन युन्नुस मुलाणी वय 27रा.कालगाव ता.कराड याच्यावर दारू वाहतुकीचा कोणताही अधिकूत परवाना नसल्याने मोहसीन मुल्लावर
गुन्हा दाखल करून इंडिका गाडीसह सुमारे एक लाख 62हजार 480रुपयाचा ऐवज जप्त केला तसेच मोहसीन मुलाणीवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर खरशिंगे गावचे हद्दीतील एका शेतातील घराच्या आडोशाला बेकायदेशीरपणे दारुविक्री करणार्या बबन खाशाबा जाधव वय 55यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी 3हजार 276रुपयांच्या 63 दारुच्या बाटल्या जप्त केल्या .
या दोन्ही प्रकरणी प्रशांत पाटील यांनी औंध पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास सपोनि उत्तम भापकर करीत आहेत.
अवैध्यरित्या दारु वाहतूक व साठाप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल
RELATED ARTICLES