श्री.छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्स यांच्या अथक प्रयत्नांना यश
परळी : ठोसेघरच्या धबधब्यात अडकलेल्या दोन विद्यार्थांना ट्रेकर्सच्या मदतीने मध्यरात्री काढण्यात आले. इंजिनियरींग क्षेत्राशी निगडीत असलेले निसर्ग शेट्टे, श्रेयस सातपुते, निहार श्रोत्री, अक्षय देशमुख हे चार विद्यार्थी सकाळी ठोसेघर फिरण्यासाठी आले होते. हे विद्यार्थी ठोसेघरच्या वरुन धबधबा न पहाता त्यांनी ठोसेघर जवळील पायवाटेने दरीच्या दिशेने खाली उतरण्यास सुरवात केली.
एका मध्यावर गेल्यावर त्यांना लक्षात आले की आपण ज्या पध्दतीने खाली उतरत आहे त्या पध्दतीने आपण वरती जाऊ शकत नाही. म्हणून त्यांनी दुपारी पुन्हा वरती येण्याचा निर्णय घेतला आणि ते परतीच्या प्रवासाला निघाले.
डोंगरावरील ओले गवत आणि पाऊसाचा जोर वाढत गेल्यावर या चौघांनाही वरती येण्या येत नव्हते. अंधार पडल्यावर तर त्यांना डोंगरातील पायवाटाही दिसने बंद झाले. त्यातील दोन युवक कसे बसे वरीत आले आणि त्यांनी फोन वरुन ट्रेकर्सशी संपर्क साधून मदत मागवली.
रात्री 10.30 वाजता राहुल तपासे आणि छ शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्स टिमने या मुलांची शोध मोहिम सुरु केली. रात्री 1 वाजता निहार श्रोत्री, अक्षय देशमुख ही मुले दरीत आढळून आली. प्रथम त्यांना पाणी ग्लुकोन डी आणि खान्यासाठी साहित्य दिले. या दोन्ही मुलांना ट्रेकर्सनी पहाट 3 वाजता ठोसेघरच्या धबधब्यातून वरती काढले.
या मोहिमेत राहुल तपासे, शर्मा, चंद्रसेन पवार, अविनाश पवार, दिग्विजय पवार आणि इतर सहकारी ट्रेकर्स सहभागी झाले होते. त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी अभिनंदन केले.
निसर्गाशी का खेळताय?
ठोसेघर हा धबधबा पहान्यासाठी प्रशासकिय यंत्रनेने अनेक ठिकाणी सुसज्ज अशी व्यवस्था केली असताना या अशा पध्दतीच्या चुकिच्या धाडसी कृत्यामुळे अनेकवेळा मुल अडकत असतात. या परिसरातील अनेक घटणांमध्ये जिव गमवलेल्या युवकांची लिस्ट फलकावर लावली आहे मात्र हे वाचूनही पर्यटक आपल्यावर नियंत्रन ठेवत नाहीत या बाबत ट्रेकर्सनी खंत व्यक्त केली आहे. हुल्लडबाज युवकांवर पोलिसांनीही जबर बसवावी अशी मागणीही होत आहे.
ठोसेघर धबधबा येथे अडकलेल्या ट्रेकर्सना बाहेर काढण्यात यश
RELATED ARTICLES