Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीमराठा क्रांती मोर्चाची आज सातार्‍यात जिल्हास्तरीय सभा

मराठा क्रांती मोर्चाची आज सातार्‍यात जिल्हास्तरीय सभा

सातारा : मराठा क्रांती मोर्चा राजधानी साताराच्या पदाधिकारी, समन्वयक आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची जिल्हास्तरीय सहविचार सभा आज (शनिवार), दि. 12 ऑक्टोबर रोजी सातार्‍यात आयोजित करण्यात आली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर संघटनेची आगामी ध्येयधोरणे ठरविण्यासाठी ही महत्त्वाची सहविचार सभा होत आहे. सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी आणि क्रांतीची भूमी असल्याने आजवर संपूर्ण देशाला दिशा देण्याचे काम सातार्‍याने केले आहे. मराठा क्रांती मोर्चासाठीही सातारा नेहमीच दिशादर्शक राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्याच्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीबाबत घ्यावयाचा निर्णय आणि संघटनेच्या आगामी ध्येयधोरणांविषयी चर्चा करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येत आहे. सातार्‍यातील कल्याण रिसॉर्टमध्ये शनिवारी सकाळी 11 वाजता होणार्‍या या सभेस उपस्थित राहून सर्व जबाबदार पदाधिकार्‍यांनी आपली मत मतांतरे व्यक्त करावेत आणि महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा राजधानी सातारा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
मराठा क्रांती मोर्चाची आजवरच्या विविध निवडणुका आणि सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीबाबतची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यादृष्टीने सर्व जबाबदार समन्वयक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular