Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीदादाज बिर्याणी दुकानाला अचानक लागली आग

दादाज बिर्याणी दुकानाला अचानक लागली आग

सातारा : छ. शाहू क्रीडा संकुलांच्या गाळ्यांमध्ये असलेल्या दादाज बिर्याणी या दुकानाला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागल्याने एकच गोंधळ झाला. सुदैवाने आग वेळीच आटोक्यात आणल्याने जीवित व वित्त हानी झाली नाही. आग भटारखान्यात अचानक झालेल्या गॅस गळतीमुळे झाल्याचे सांगण्यात आले.
दादाज बिर्याणी हाऊस हे सातार्‍यातील खवैय्यांचे हककाचे ठिकाण आहे. दादाज बिर्याणी हाऊस हे दोन गाळ्यांमध्ये आहे. रोजचे दैनंदिन काम सुरू असताना बिर्याणी हाऊसच्या भटारखान्यात गॅस गळती होऊन अचानक आग लागल्याने एकच धावपळ झाली. आग एकदमच भडकून बाहेर आल्याने भीतीचे वातावरण निर्माण होऊन गाळ्याचे छ्तही उष्णतेने काळे पडले. हे बिर्याणी हाऊस फडतरे यांच्या मालकीचे असून सकाळी पावणेअकराच्या दरम्यान तंदुर भट्टी पेटवताना सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने अचानक आग भडकली त्यामुळे भटार खान्यातील कामगार बाहेरच्या बाजूला पळाले. सुदैवाने जिवित हानी झाली नाही. पालिकेची अग्निशमन यंत्रणा तातडीने पोहचल्याने आग त्वरित नियंत्रणात आणण्यात आली. दादाज बिर्याणीला आग लागल्याचे वृत्त कळताच बघ्यांची स्टेडियम परिसरात गर्दी झाली होती. पोलिसांनी सुद्धा घटनास्थळाला भेट घेऊन घटनेची माहिती घेतली .

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular