कराड: कराड नगरपरिषदेच्या माध्यमातून कृष्णा नाका सर्कलमध्ये कारंजे बसवण्यात आले आहेत. मात्र ज्या सर्कलमध्ये कारंजे बसवले आहेत. त्या सर्कलचीच मोठया प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सर्कलच्या कठड्याची मोडतोड झाली आहे. त्यामुळे कारंजामुळे चौकाच्या सौंदर्यात भर पडत असली तरी सर्कलच्या दुरवस्थेमुळे कृष्णा नाक्याचे विद्रुपीकरण समोर येत आहे.
स्वच्छ कराड, सुंदर कराड अभियानांतर्गत कराड नगरपरिषदेच्या माध्यमातुन शहरातील चौकांचे सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामाध्यमातुन कोल्हापुर नाका येथे आय लव्ह. यु. कराड हा सेल्फी पाँईंट उभारला आहे. युवा वर्गातुन पालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. तर पालिकेने कोल्हापुर नाका, पंचायत समिती, शिवाजी हौसिंग सोसायटी बाग, कृष्णा घाट व कृष्णा नाका आदी ठिकाणांच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे. संध्याकाळच्या वेळी तरूणाई आय लव्ह यु सेल्फी पॉईंट व कारंजासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.
या मोहिमे अंतर्गत पालिकेने कृष्णा नाक्यावरील सर्कलमध्ये बांधकाम करून कारंजा बसवण्यात आला आहे. मात्र येथील जुन्या सर्कलमध्ये बांधकाम करून कारंजा बसवण्यात आला आहे.
मात्र येथील जुन्या सर्कलची मोठया प्रमाणात दुरवस्था झाली असुन सर्कलचा कठडा ठिकठिकाणी फुटला आहे. तर सर्कलवरील संरक्षक जाळीही पुर्ण गंजली असून तुटली आहे. त्यामूळे कारंजामुळे सौंदर्यात भर पडत असली तरी सर्कलच्या दुरवस्थेमुळे कृष्णा नाका परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे पालिकेने कारंजा बसवलेल्या सर्कलचेही नुतनीकरण करण्याची मागणी होत आहे.
कृष्णा नाका सर्कलची दुरवस्था, संरक्षक जाळीही तुटली, नागरिकांमध्ये नाराजी
RELATED ARTICLES