फलटण : निंबळक (30 फाटा) येथील नवनाथ अशोक यादव वय 27 या युवकास विद्युत शॉक लागून जागीच ठार झाला.
याबाबत मिळालेली माहीती अशी की, निबंळक, ता. फलटण येथील नवनाथ यादव हा आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेतातील मोटर सुरु करणे करीता गेला असता त्यास केबिन बॉक्सचा शॉक लागल्याने जागीच ठार झाला असून निंबळक हद्दीतील बोडके वस्तीवरील शिवारात ही घटना घडली आहे.
तेथील लोकांनी त्यास तातडीने उपचारासाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत झाल्याचे घोषित केले. महावितरणच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली असून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करुन अधिक तपास फलटण ग्रामीणचे पोलिस अधिकारी करीत आहेत.
विद्युत शॉक लागून युवक जागीच ठार
RELATED ARTICLES