Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडी‘मुख्यमंत्र्यांनी कराड-चिपळूण रेल्वेमार्गाचा निधी बुलेट ट्रेनकडे वळवला’

‘मुख्यमंत्र्यांनी कराड-चिपळूण रेल्वेमार्गाचा निधी बुलेट ट्रेनकडे वळवला’

कराड: मी केंद्रात मंत्री असताना माझा आवडता ड्रीम प्रोजेक्ट म्हणून कराड-चिपळूण रेल्वेमार्गास मी मंजूरी आणली. त्या कामाचे तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला येवून माझ्यासमवेत भूमिपूजनही केले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे पैसे बुलेट ट्रेनकडे वळवून या कामाला खीळ आणली. परंतु हा रेल्वेमार्ग मी करणारच. अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
काले येथील जाहीर सभेत ते बोलत होते. आ. रामहरी रुपनवर, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, अ‍ॅड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील-उंडाळकर, मनोहर शिंदे, अजितराव पाटील-चिखलीकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, पोलीस पाटील शामराव पाटील, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात यांच्यासह मान्यवर व ग्रामपंचायत सदस्यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. आ. चव्हाण म्हणाले, मी मुख्यमंत्री असल्यापासून आजपर्यंत कराड दक्षिणमध्ये केलेल्या कामाबाबत काहीही शंका असल्यास त्या कामांचे जीआर माझ्याकडे आहेत. कराड-चिपळूण रेल्वेमार्गाच्या कामाचे भूमिपूजन सुरेश प्रभु यांनी मला घेवून केले. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी कराड-चिपळूण रेल्वे मार्ग अडवला आहे. काहीही झाले तरी तो मार्ग मी करणारच. मी केंद्रात मंत्री असताना कराडमधील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाजवळ संरक्षक भिंत बांधली. त्यानंतर कराड नगरपालिकेकडून दहा टक्के स्वनिधी गुंतवणूक असणारा 39 कोटी रुपयांचा निधीही आणला. परंतु स्वनिधी वेळेत न भरल्याने तो निधी परत गेला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विकासकामांबाबत बेताल वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या चष्म्याचा नंबर वाढला हेही मी समजू शकतो. परंतु काही मंडळी झोपेचे सोंग घेवून कराडला विकासनिधी कोणी आणला. हे सोयीस्करपणे विसरत आहेत. आ. रामहरी रुपनवर म्हणाले, पृथ्वीराजबाबांनी संगणकामध्ये देवनागरी लिपी पहिल्यांदा आणली. त्यामुळे कराड दक्षिणमधील जनतेचे मत सामान्य माणसाला नसून, संगणकामधील जनकाला तुम्ही मत देणार आहात. हजारांपेक्षा 50 तील पोशिंदा आला पाहिजे हे लक्षात घेवून तुमचे मत मुख्यमंत्र्यांना देणार आहात.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular