Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीकोसळणार्‍या पावसात शरद पवार कडाडले

कोसळणार्‍या पावसात शरद पवार कडाडले

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचार सभांच्या झंझावाताची चर्चा राज्यभर चांगली रंगली. वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मिडीयात व्हायरल झाले. आता सातार्‍यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचार सभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणार्‍या पावसात सभेला संबोधित केले.
पवार पुढे बोलताना म्हणाले, माणसाने झालेल्या चुका मान्य करायला पाहिजेत. तशी चूक मी मान्य करतो. लोकसभेला विरोध असतानाही चुकीच्या माणसाला मी उमेदवारी दिली. मात्र आता ती चूक सुधारली आहे. सातारकर त्याप्रमाणे निर्णय करतील आणि महाराष्ट्रात चमत्कार घडवतील.
कोसळणार्‍या मुसळधार पावसात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपले भाषण सुरु ठेवले अन तब्बल सात ते दहा मिनिटांच्या भाषणातून साहेबांनी कार्यकर्त्यांना उर्जा देत माझी चूक झाली पण आता नाही. लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन केले.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवार) राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्वेसर्वो शरद पवार यांची जिल्हा परिषद मैदानावर सभा आयोजिली होती. सभेचे प्रारंभी आ. मकरंद पाटील, बाळासाहेब चव्हाण, शशिकांत शिंदे यांची भाषणे झाली. आमदारांचे भाषण सुरु असताना पावसाच्या सरी कोसळत होत्या. शिंदे यांचे भाषण सुरु झाल्यानंतर पाऊस वाढू लागला. संपुर्ण मैदान कार्यकर्त्यांनी खचाखच भरले होते. शिंदे यांचे जोशपुर्ण भाषणामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता. कार्यकर्ते खूर्च्या डोक्यावर तसेच उभे राहिले. काही मिनीटांतच शरद पवार यांचे सभास्थळी आगमन झाले.
व्यासपीठावरील कार्यकर्त्यांनी माईकवरुनच कोण आला रे कोण आला असे उच्चारत्ताच मोदी-शहाचा बाप आला…पुन्हा कोण आला रे आला…महाराष्ट्राचा बाप आला अशा आरोळ्या देण्यास प्रारंभ केला. त्यानंतर रामराजे नाईक – निंबाळकर यांचे भाषण झाले. त्यांनी ही उदयनराजे यांचे नाव न घेता आता समाधान वाटत आहे. निश्‍वास सोडल्याचे वक्तव्य करताच एकच जल्लोष झाला. त्यानंतर शरद पवार यांचे भाषण सुरु झाले. तेव्हा पाऊस वाढू लागला. मुसळधार पावसात पवार यांनी आपले भाषण सुरु ठेवून कार्यकर्त्यांना उर्जा दिली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular