सातारा : सातारा जिल्हयातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्यासाठी तब्बल सव्वीस हजार कर्मचारी सज्ज झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून कर्मचार्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी एकवीस हजार व मतमोजणी प्रक्रियेसाठी पाच हजार कर्मचारी असे वर्गीकरण करण्यात आले आहे. सहा विधानसभा मतदार संघाची मतमोजणी एकाच वेळी एकाच ठिकाणी होणार असल्याने अडीच हजार कर्मचार्यांची जादा नेमणूक करावी लागली.
लोकसभा व विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या जास्तीत जास्त तेहतीस फेर्या होणार असून मतमोजणी प्रक्रिया बारा तासापेक्षा अधिक काळ चालणार आहे. जाहीर प्रचाराची सांगता शनिवारी दि 19 रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असून मतदान सोमवारी दि. 21 रोजी होत आहे. प्रत्यक्ष मतमोजणी अवघ्या 48 तासावर येऊन ठेपल्याने प्रशासनाची प्रचंड धावपळ सुरू आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सर्व प्रांताधिकार्यांची बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला. एकवीस हजार कर्मचारी प्रत्यक्ष मतदानासाठी व पाच हजार कर्मचारी मतमोजणी करिता नियुक्त झाले आहेत लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे मतदान जिल्हयातील 2562 मतदान केंद्रावर होणार असून जिल्हा प्रशासनावर निवडणुकांच्या तयारीचा जास्त ताण पडला आहे.
दोन टप्प्यात गेल्या चार दिवसापासून कर्मचार्यांचे प्रशिक्षण सुरू असून गुलाबी रंगाची पट्टी असणारे ईव्हीएम मशीन लोकसभेसाठी व पांढरी पट्टी असणारे ईव्हीएम मशीन विधानसभेसाठी वापरण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच अधिकारी व सहा कर्मचारी असणार आहेत. ईव्हीएम मशीन, व्हीव्ही पॅट मशीन हाताळणे आणि मतदानानंतर मशीन सील करणे आणि सुरक्षितरित्या या मशीन योग्य ठिकाणी जमा करणे इं गोष्टीचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. कर्मचार्यांच्या नेमणुका त्यांचा स्थानिक रहिवास टाळून अन्य मतदारसंघात करण्यात आल्या आहेत.
निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी २६ हजार कर्मचारी सज्ज
RELATED ARTICLES