भुईंज: भुईंज ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वार्ड निहाय झालेल्या लोकसभा व विधानसभा मतदानासाठी उत्साहात मतदान झाले असून सायंकाळी 6 वाजता सरासरी 76 टक्के मतदान झालेची माहिती तलाठी सीमा साबणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
भुईंज ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वार्डनिहाय बुथ नंबरप्रमाणे मतदान केद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासूनच पाऊसाने उघडीप दिल्याने मतदारांचा उत्साह सायंकाळपर्यंत टिकून राहिला.
जेष्ठ अपंग आणि दिव्यांगांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सोय केली होती. जेष्ठ नेते व माजी मंत्री प्रतापरावजी भोसले़ महायुतीचे उमेदवारमदन प्रतापराव भोसले व त्यांचे कुटुंबिय यांनी दुपारी 1 वाजता मतदानाचा हक्क बजावला.
सायंकाळी 6 वाजता घेतलेल्या आढाव्यात निवडणूक अधिकारी ़तलाठी सीमा साबणे व महेश सुतार यांनी सरासरी 76 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. सर्वाधिक मतदान भवानी वार्ड चाहूर येथे झाल्याची नोंद आहे.
वाईमध्ये लोकसभा व विधानसभेसाठी सहा पर्यंत सरासरी 76 टक्के मतदान
RELATED ARTICLES