फलटण: पंढरपूर- फलटण रस्त्यावर राजूरी (घोलपवस्ती) जवळ मालट्रक झाडावर आदळून चालक ठार झाला असून दोन गंभीर जखमी झाले आहेत.
23 ऑक्टोंबर रोजी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास पंढरपूर – फलटण रोडवर मालट्रक क्र. घअA 56/ 7444 मधून फलटण बाजूकडे जात असताना ट्रकचालक नागेश दौलतराव काळे वय 41 वर्षे राहणार जाळकोट (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) यांनी आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवून व समोरील वाहनाचे लाईट डोळ्यावर पडल्यावर ट्रक बाजूला घेत असताना झाडाला ठोकर बसल्याने चालक नागेश काळे जागेवर ठार झाले असून महेश अशोक फाळके (वय 30) राहणार सोलापूर व अमीत अशोक गायकवाड (वय 22 वर्षे) राहणार येणेगूर (ता.उरमला जि. उस्मानाबाद) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक यु. एस. शेख करीत आहेत.
राजूरीजवळ मालट्रक झाडावर आदळून चालक ठार
RELATED ARTICLES