Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीपृथ्वीराज चव्हाण यांचा विरोधकांच्या व्ह्युवरचनेला छेद:आ.बाळासाहेब पाटील यांची विरोधकांवर मात

पृथ्वीराज चव्हाण यांचा विरोधकांच्या व्ह्युवरचनेला छेद:आ.बाळासाहेब पाटील यांची विरोधकांवर मात

कराड : कॉग्रेसचे कराड दक्षिणमधील उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवासाठी विरोधकांनी व्ह्युवरचना केली होती.,मात्र या व्ह्युवरचनेला छेद देत पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत सर्वच विरोधी उमेदवारावर मात केली. तीच परिस्थिती कराड उत्तर मध्ये झाली. राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील यांनीही पहिल्या फेरीपासून विरोधी उमेदवारावर आघाडी घेत विरोधकांचा मोठ्या मताधिक्यांने पराभव केला.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात कॉग्रेचे पृथ्वीराज चव्हाण, भाजपाचे डॉ.अतुल भोसले, रयत संघटनेचे अपक्ष उमेदवार अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्यात सामना झाला. या तिघा उमेदवारांनी विजयाचा दावा केला होता. सर्वांनीच जीवाची बाजी लावली होती. त्याच्यांविरोधातील भाजपचे उमेदवार डॉ.अतुल भोसले यांनी मोठे आव्हान उभे केले होते. तसेच आपल्या विजयासाठी त्यांनी अनेक व्ह्युवरचना त्यांनी आखल्या होत्या. मात्र त्यांना सर्वच पातळीवर अपयश आल्याचे दिसून आले. तसेच कॉग्रेसचे माजी आ. विलासराव पाटील- उंडाळकर यांनी आपले सुंपुत्र उदयसिहं पाटील यांच्या राजकीय भवीतव्याच्या दृष्टीने रयत संघटनेच्या माध्यामातून सुपुत्राचे नशीब अजमवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात यश मिळाले नाही.
विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक म्हणून मानले गेलेले आ.आनंदराव पाटील यांनी ऐन निवडणूकीच्या तोंडावर पृथ्वीराज चव्हाण यांची साथ सोडून भाजप गटाशी हात मिळवणी केली. परंतु आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या समर्थकांच्या सामर्थ्यावर निवडणूक लढविली. त्यांना जनतेनेही साथ केली.
दरम्यान एमआयएम चे उमेदवार अल्ताफ शिकलगार, बहुचन वंचित आघाडीचे उमेदवार संजय देसाई, आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हे या निवडणूकीत चर्चेत होते. ते कोणाच्या पराभवाला कारणीभूत ठरणार याची सर्वाना उत्सुकता होती. मात्र मतदारांनी त्यांच्याकडे पुर्ण पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले.
तर कराड उत्तर मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आ.बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील कदम तसेच अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांच्यात लढत झाली. यामध्ये द्वितीय क्रमांकाची मते अपक्ष उमदेवार मनोज घोरपडे यांना मिळाली. तर शिवसेनेचे धैर्यशील कदम यांना मतदारांनी तिसर्‍या क्रमांकावर फेकले. यात आ.बाळासाहेब पाटील यांनी पुन्हा एखादा विजयाचा झेंडा फडकविला.
सातारा येथे मतमोजणी प्रक्रिया अतिंम टप्प्यात असताच मतदानातील आघाडी पाहून कराड येथे आ.पृथ्वीराज चव्हाण व आ.बाळासाहेब पाटील यांच्या समर्थक कार्यर्त्यांनी जलोष केला. फटाक्याच्या अतषबाजीत व गुलालाच्या उधळणीत आनंद व्यक्त केला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular