Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीजनतेने आनंदात उधळला गुलाल नि आमदार पत्नीने बजावले कर्तव्य

जनतेने आनंदात उधळला गुलाल नि आमदार पत्नीने बजावले कर्तव्य

सातारा (अजित जगताप) : दिवाळी म्हटलं की, सर्व घरातील साफसफाईची जबाबदारी गृहिणींना पार पाडावी लागते.पण, जेव्हा विजयाचा गुलालाने अंगण भरते. तेव्हा आमदारांच्या ही पत्नीला साफसफाईचे मकर्तव्यफपार पाडावे लागते. हे सातरकरांनी अनुभवली आहे.
सातारा ही छत्रपती शिवराय यांची राजधानी आहे. या राजघराण्यातील भाजपचे आमदार श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातारा-जावळी विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांना विजय झाला होता. तर दुसर्‍या बाजूला थोरले बंधू व खासदारकीचे उमेदवार श्री छ उदयनराजें यांच्या पराभवाची खंत होती. तरीही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. सातारा व जावळी तालुक्यातून आलेल्या शेकडो समर्थकांनी तसेच कार्यकर्त्यानी मसुरुचीफ या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी भर पावसात गुलालाची उधळणं करून आनंद व्यक्त केला. पावसातही गुलालाचे धुके पसरावे असे दृश्य दिसत होते.हीच परिस्थिती सकाळी उठल्यावर आवारात पाहून आमदार पत्नी श्री छ सौ वेदांतिकाराजे भोसले यांच्या तील सामाजिक कार्यकर्त्यानी साफसफाई साठी पुढाकार घेतला. यापूर्वी मकर्तव्यफ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेकदा सातारा शहरातील स्वच्छतेसाठी श्री छ सौ वेदांतिकाराजे (वहिनीसाहेब) यांच्या हातात झाडू पहिला आहे.त्यामुळे आमदारांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या समर्थकांना सुध्दा खूपच नवल वाटले होते. गुलालाने माखलेले अंगण पाण्याच्या फवार्‍याने स्वच्छ करण्यासाठी त्या पुढे सरसावल्या होत्या तसेच एका हाताने जनतेचे आभार मानत होते. सामान्य गृहिणी सारख्या घराची जबाबदारी ही पेलणार्‍या वहिनीसाहेबांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या आमदारकीच्या निवडणुकीत प्रचार व नियोजनात ही आपली चुणूक दाखवून दिली होती. मतमोजणी च्या दुसर्‍या दिवशी घरात नोकर-चकार असतानाही स्वच्छता राखण्याचा संदेश देणार्‍या आमदार पत्नीचे खरं म्हणजे कौतुक केले पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजप महिला अध्यक्ष गीताताई लोखंडे, पंचायत समिती सदस्या सौ सरिता इंदलकर, सौ सरिता भिसे व आघाडी पक्ष प्रतोद अविनाश कदम व साताकरांनी दिली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular