Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीसातार्‍यात वसुबारस उत्साहात

सातार्‍यात वसुबारस उत्साहात

छत्री घेऊन सातारकर बाहेर पडले खरेदीला
सातारा : प्रकाश, उत्साह आणि आनंद देणारा सण म्हणजे दिवाळी. या सणाला नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा असतो. दिवाळी हा पाच दिवस चालणारा सण आहे. त्यामध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा, भाऊबीज यांचा समावेश होतो. तसेच प्रथेनुससार गाय आणि वासरांची पूजा करून वसुबारस साजरी केली जाते. दरवर्षीप्रमाणे पंचपाळी हौद ट्रस्टच्यावतीने दिवाळीची सुरुवात म्हणून गायींची व वासरांची पूजा केली गेली.
भारतीय संस्कृतीत गाय आणि वासराचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे गायीची पूजा केली जाते. मानवाला जीवन देणार्‍या या गायीची पूजा करण्याचा दिवस म्हणून बसुबारस साजरी केली जाते. या दिवशी गायींची पूजा करून त्यांना जेवू घातले जाते. पंचपाळी हौद ट्रस्टच्यावतीने 6 गायी आणि वासरांची पूजा केली जाते.
दिवाळीच्या सणातील धन-त्रयोदशी हा एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये आयुष्यात पैसा किंवा धनाची कमी पडू नये यासाठी धनाची पूजा केली जाते. सातार्‍यात घरोघरी धन्वंतरीची पूजा करण्यात आली. ही पूजा सर्व घरात केली जात असल्यामुळे त्यासाठी लागणारे धने आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी ़झाली होती. तांब्याचे पात्र आणि ताट खरेदीसाठी नागरिक भांड्यांच्या दुकानांमध्ये दिसून येत आहे.
दिवाळीच्या उत्साहावर पावसाचे पाणी अरबी समुद्रातील चक्रीवादळ क्षीण होत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रात सातत्याने पाऊस सुरू आहे. सातार्‍यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या उत्साहावर पाणी फिरले. सायंकाळी पंचपाळे हौद, मंगळवार तळे,धनिणीची बाग, सदर बझार, करंजे, इ. ठिकाणी वसुबारस निमित्त गाईची पूजा करण्यात आली. दिवाळसणाचा गोड पक्वानांचा घास गाईना भरवण्यात आला. मात्र हे पारंपारिक विधी पावसाच्या रिपरिपीमुळे चक्क शेड बांधून करण्यात आले. नागरीकांना पावसाला न जुमानता चक्क छत्र्या डोक्यावर घेऊन खरेदी केली. भर पावसात खण आळी आणि व्यापारी पेठांमध्ये गर्दी दिसून आली. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिसांनी बॅरीकेटिंग उभारले होते. पावसाची संततधार आणि वाहतुकीची कोंडी यामुळे राजपथावर प्रचंड गर्दी झाली होती. त्या गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांची प्रचंड कसरत झाली. भर पावसातही आकाश कंदिल आणि दिव्यांनी सातारा उजळून निघाला होता.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular