सातारा : येथील डी मार्ट जवळ वाहनाच्या चाकाचा पंक्चर काढून वाहनांमध्ये बसताना पाठीमागून आलेल्या इंडिगो कारने एकाला उडवल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की उमर फारूक दस्तगीर (वय 29) रा. कागल, जि. कोल्हापूर हे गुरुवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून कोल्हापूरकडे जात असताना सातारा हद्दीत असणार्या डी-मार्ट जवळ त्यांचे चार चाकी वाहन पंक्चर झाले. चाकाचा पंक्चर काढून वाहनांमध्ये बसताना पाठीमागून आलेल्या भरधाव इंडिगो कारने त्यांना उडवल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
डी-मार्ट जवळ अपघातात एकाचा मृत्यू
RELATED ARTICLES