रहिमतपूर: वाचन संस्कृती जतन व संवर्धन करणारी सार्वजनिक ग्रंथालय, दिवाळी अंकांचेही योजना राबवितात हाही उपक्रम राबविण्यात येतो हा उपक्रम स्तुत्य व कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव कोरे यांनी केले. ते रहिमतपूर (ता.कोरेगाव) येथील हिंद नगरवाचनालय व ग्रंथालयातर्फे दिवाळी अंक योजना2019 या योजनेच्या दिवाळी अंकाचे प्रदर्शनाचे उदघाटन समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य दत्तात्रय वीर होते. यावेळी कृषि उपसंचालक कु.प्रणाली सुधीर चव्हाण, प्रा.भानुदास भोसले, नगरसेवक विद्याधर बाजारे, शशिकांत भोसले, शिवराज माने, विनायक माने पाटील, माधवराव माने, विकास पवार, नाना राऊत सर्व नगरसेवक आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आनंदराव कोरे पुढे म्हणाले की, वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी हिंद नगरवाचनालय व ग्रंथालय याबाबत सदैव प्रयत्नशील आहे. परंतु आजच्या युवक युवतीनी याकडे ज्या प्रमाणात आकर्षित व्हायला हवीत पण तसे होत नाही त्याकरिता आपणच त्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणे ही आजच्या काळाची गरज आहे. हिंद नगरवाचनालय व ग्रंथालय हे रहिमतपूर नगरपरिषदेला वर्ग करण्यात आले आहे. लवकरच अजितदादा सांस्कृतिक भवनात स्थलांतर करण्यात येणार आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे या या कामाला विलंब होत आहे.तसेच अजितदादा सांस्कृतिक भवनाची किरकोळ डागडुजी करावयाची आहे.
सध्या आचारसंहिता असल्याने विलंब होत आहे पण लवकरच ते काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही ते म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून, दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन, श्रीफळ वाढवून दिवाळी अंकांचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांचे स्वागत महात्मा गांधी यांच्या चरित्र ग्रंथ देऊन करण्यात आले. यावेळी कृषि उपसंचालक कु.प्रणाली सुधीर चव्हाण यांचा सत्कार नाना राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अंकुश माने, संभाजी माने, साहेबराव चव्हाण, रामचंद्र चव्हाण, चुनीलाल चव्हाण, दिलीप भोसले, संतोष भोसले, प्रदिप खटावकर, महेंद्र शहा, सर्जेराव कारंडे, वाचक सभासद, कार्यकारी, विश्वस्त, जेष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक संजय जंगम यांनी केले. सुत्रसंचालन विलास शिंदे यांनी केले.आभार कु.उमा सावंत यांनी मानले.
वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न आवश्यक: कोरे
RELATED ARTICLES