Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीधन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

सातारा : सहकार क्षेत्रात संपूर्ण महाराष्टात आदर्शवत व सक्षम असलेल्या धन्वंतरी नागरी सह. पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम अतिशय आनंदी व उत्साहाच्या वातावरणात मुख्य कार्यालयात पार पडला.
धन्वंतरी देवतेचे पुजन संस्थेचे सभासद व सहकार तज्ञ श्री. दुष्यंतराव जगदाळे यांचे हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी बोलताना संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले म्हणाले, आजपर्यंतच्या सर्व संचालक व सहका-यांनी आपणां सर्वाच्या सहकार्याने धन्वंतरी पतसंस्था राज्यात प्रथम क्रमांकाची सक्षम पतसंस्था केली याचा मनस्वी आनंद होत आहे. धन्वंतरी पतसंस्थेचा आदर्श सहकारातील इतर वित्तीय संस्था घेत असून त्यांची प्रगती साधत आहेत याचा आम्हांस अभिमान वाटतो. आजमितीस संस्थेकडे 166 कोटी रुपयेच्या ठेवी असून 115 कोटी रुपयाचे कर्जवितरण केले असून संस्थेचा एकूण व्यवसाय 281 कोटी रुपये झाला आहे. तसेच 93 कोटी रुपये इतक्या रकमेची सुरक्षित गुंतवणूक आरबीआय गे्रड ए असलेल्या विविध बँकामध्ये संस्थेने केली आहे. संस्था सक्षमता व विनियोग पाहूनच सभासदांच्या आर्थिक गरजा भागवित असते. संस्था सुरुवातीपासूनच कर्जवसुली बाबत दक्ष राहील्यामुळे पतसंस्थेच्या कर्जदारांनाही नियमित हप्ते भरण्याची सवय लागली आहे आणि यामुळेच संस्थेचा एन.पी.ए. अल्प राहीला आहे. संस्थेचे सर्व संचालक विश्‍वस्ताच्या भावनेने पारदर्शक व्यवहार करत आहेत व सेवकही सभासदांना विनम्र सेवा देवून संस्थेच्या वाढीसाठीच सतत काम करीत आहेत. संस्थेस महाराष्ट शासनाने आदर्श कामकाजाकरीता राज्यातील सर्वोच्च असा सहकार भूषण पुरस्कार बहाल करुन गौरविले आहे यापुढेही असेच काम करुन संस्थेचा नावलौकीक हा महाराष्टातच नाही तर पूर्ण देशात वाढवावा असे त्यांनी यावेळी सांगीतले व पतसंस्था वाढीस मोलाचे सहकार्य करणा-या संचालक सभासद ठेवीदार व सेवक वर्गाचे आभार मानले.
याप्रसंगी सहकार तज्ञ श्री. दुष्यंतराव जगदाळे म्हणाले की, संस्थेने केलेली प्रगती हि कौतुकास्पद असून तिच्या भक्कम आर्थिक स्थीतीमुळेच ठेवीदारांचा भक्कम विश्‍वास संस्थेवर आहे. संस्था सामाजिक बांधीलकीचे जाणीवेतून विविध कार्यक्रम राबवित आहे असेच सामाजिक कार्य तिने भविष्यातही चालू ठेवावेत अशी अपेक्षा व्यक्त करुन संस्थेच्या कामकाजाचे कौतुक करुन त्यांनी सत्काराबदद्ल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सहकार भूषण पुरस्कार मिळवणा-या धन्वंतरी पतसंस्थेस तिच्या उत्तम कार्याच्या जोरावर सहकार महर्षी हा पुरस्कार नक्कीच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली व पतसंस्थेच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे याप्रसंगी बोलताना म्हणाले, कलीयुगात रुग्णांना सेवा देवून त्यांची सुश्रृषा करुन त्यांना जीवनदान देणारे डॉक्टर्स हे आजचे खरे धन्वंतरी आहेत. पतसंस्थेने सभासदांसाठी केलेल्या विविध ठेव व कर्ज योजनांचा लाभ सर्वांनी घेवून पतसंस्थेच्या व्यवसायवाढीस हातभार लावावा. तसेच सभासदांसाठी विशेष अशी 10 ं/. व्याजदराची कर्ज योजना सुरु केली असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले व सर्व उपस्थितांचे आभार मानले व संस्थेची समाजात असलेली प्रतिष्ठा व विश्‍वास जपण्याचा तसेच वृध्दिंगत करण्याचा निश्‍चय केला.
याप्रसंगी संस्थेचे सभासद व ठेवीदार यांनी संस्थेच्या कामकाजाबदद्ल व मिळत असलेल्या ग्राहकसेवेबदद्ल समाधान व्यक्त केले व भावी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संचालक डॉ. अरविंद काळे यांनी पाहुण्याचे स्वागत व परीचय करुन दिला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
सदर प्रसंगी संचालक डॉ. क.श्री. लाहोटी, डॉ. शिरीष भोईटे, डॉ. शकील अत्तार, डॉ. सुनिल कोडगुले, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. राजेंद्र सरगर, डॉ.कैलास खडतरे, डॉ.सौ. सारीका मस्कर, श्री. सुर्यकांत देशमुख, डॉ. अभिजीत भोसले, सभासद व सेवक वर्ग उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular