म्हसवड: माण तालुक्यातील पळशी येथील माणगंगानदी पात्रात चौघेजण वाहून गेले. त्यापैकी तिघेजण सापडले असून तुकाराम खाडे (वय 28) हा युवक वाहून गेला असल्याने आपत्कालीन पथक शोध घेत आहे. सापडलेले दोघेही शासकीय कर्मचारी असून त्यांना अधिक उपचारासाठी म्हसवड येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक अशी की, पळशी (ता.माण) येथील अनेक तरूण दिवाळीच्या सुट्टीत गावी आले आहेत. आज भावबीज सन आटोपून येथील माणगंगानदी पात्राशेजारी तरूणांनी पार्टीचा बेत केला होता. यामध्ये काही सरकारी नोकरही असल्याची माहिती समोर येत आहे. दुपारी उशीरा पार्टी आटोपल्या नंतर काही जणांना नशेत नदीच्या पाण्यात पोहण्याचा मोह झाल्याने काही जण नदीत पोहत असताना तिघेजण बुडल्याचे लक्षात आल्याने त्यामधील तिघेजण सापडले मात्र तुकाराम खाडे या युवकाचा तपास लागला नाही.
आपत्कालीन शोध पथक दाखल झाले असून शोध कार्य सुरू केले आहे. या घटनेची माहिती समजातच म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि गणेश वाघमोडे घटनास्थळी दाखल झाले होते. या मधील दोघेजण सापडले असून त्या अधिक उपचारासाठी म्हसवड येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाहून गेलेल्यांपैकी एकजण अजूनही बेपत्ता
RELATED ARTICLES