Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीरस्त्यांची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन; स्टेप्- भाजप नगरसेवक धनंजय जांभळे यांचा इशारा

रस्त्यांची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन; स्टेप्- भाजप नगरसेवक धनंजय जांभळे यांचा इशारा

सातारा : सातारा शहरातील व्हॉल्व लिकेजेस आणि खड्डे पडलेल्या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी अशी भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी नगराध्यक्ष माधवी कदम यांच्याकडे केली आहे. तशा आशयाचे निवेदन पालिकेच्या बार निशी विभागात दाखल झाले आहे.
रस्ते दुरूस्तीची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जांभळे यांनी दिला आहे. निवेदनात नमूद आहे की सातारा शहरात येणार्‍यांची संख्या मोठया प्रमाणावर असून शहरात ठिकठिकाणी खड़डे मोठया प्रमाणावर पडले आहेत. छोट्या मोठया वाहनांचे टायर फुटून त्यांचे नुकसान होत आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी आहे.
वाहन चालकांचा जीव प्रचंड मेटाकुटीला आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाशी प्रत्यक्ष पत्रव्यवहार व वेळोवेळी चर्चा झाली आहे. मात्र या प्रकरणाकडे या विभागाचे पूर्णतःदुर्लक्ष झाले आहे. सातारा शहरातील रस्त्यांचे तातडीने डांबरी पॅचिंग करावे अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल अशा इशारा धनंजय जांभळे यांनी दिला. सातारा शहरात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणारे व्हॉल्व नादुरूस्त आहेत त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे त्यामुळे तातडीने लिकेजेस काढण्यात यावी असे लेखी पत्र धनंजय जांभळे यांनी पाणी पुरवठा विभागाला दिले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular