सातारा: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांनी निर्देशित केल्यानुसार विधी सेवा दिन म्हणून 9 ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीत द्विसप्ताह साजरा करण्यात येत आहे.
या निमित्त जिल्हा व सत्र न्यायालयामधील इमारतीत प्रत्येक मजल्यावर एक या प्रमाणे एकूण 4 मदत कक्षांची स्थापना करण्यात आली या मदत कक्षाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत यांचे हस्ते झाले.यावेळी जिल्हा न्यायाधीश अनिस खान, वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश प्रविण अ. कुंभोजकर, दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एस.बी. देसाई, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती ए.व्ही. कस्तुरे, लॉ कॉलेजच्या प्राचार्य सुजाता पवार, वकील संघाचे अध्यक्ष अरुण खोत, उपाध्यक्ष संग्राम मुंढे, समन्वयक राजश्री सावंत व पक्षकार तसेच न्यायलयीन कर्मचारी यांचे उपस्थितीत पार पडले.
या मदत कक्षाकरीता प्रत्येकी दोन विधी स्वयंसेवक न्यायालयात येणार्या पक्षकारांना कायदेविषयक पत्रके वाटून लोकअदालतीबाबत, मध्यस्थ केंद्राबाबत व विधी सेवाच्या विविध योजनांची माहिती देण्याचे काम करणार आहेत.
विधी सेवा दिन द्विसप्ताह कार्यक्रमांतर्गत जिल्हा न्यायालयात मदत कक्षाची स्थापना
RELATED ARTICLES