फलटण: सोमंथळी (ता.फलटण) येथील शेतात महावितरणच्या पोलवरील शॉर्टसर्किटमुळे आग लागून ऊस जळून खाक झाला. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे हे शॉर्ट सर्किट झाल्याची तक्रार नुकसान ग्रस्त शेतकर्याने केली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार साधू आप्पा शिंदे यांच्या शेतात दि 8 रोजी 12 वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या वीजेच्या खांबावर जोरदार आवाज होऊन शॉर्ट सर्किट झाल्याने ऊसाने पेट घेतला. क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आल्यामुळे मोठे नुकसान टळले व लगत असणारे ऊसाचे क्षेत्र वाचविण्यासाठी ग्रामस्थांना यश आले. साधू आप्पा शिंदे यांचे ऊस क्षेत्र जळाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे. या घटनेत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
नुकसान भरपाई न मिळाल्यास महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा बाधित शेतकरी साधू आप्पा शिंदे यांनी दिला आहे. महावितरण शाखा अभियंता निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून वरिष्ठ कार्यालयास याबाबत अहवाल सादर केला आहे.
सोमंथळी येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून ऊस जळून खाक
RELATED ARTICLES