Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीकारखेल येथील कुस्ती मैदानात पै.संतोष दोरवड विजयी

कारखेल येथील कुस्ती मैदानात पै.संतोष दोरवड विजयी

म्हसवड : माण तालुक्यातील कारखेल येथील वीर सेनापती संताजी घोरपडे जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या पै. संतोष दोरवड याने पुण्याच्या पै. भारत मदने नागपट्टी डावावर चितपट करून प्रथम क्रमांकाचे एक लाख अकरा हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. प्रथम क्रमांकांचे बक्षीस सत्यजित घोरपडे यांचे तर्फ देण्यात आले. दुसर्‍या क्रमांकाची कुस्तीत पै. सुरज मूलाणी याने पै. नाना खांडेकर वर घुटना डावावर विजय मिळविला. त्यास पन्नास हजार रूपयांचे बक्षीस देण्यात आले हे बक्षिसे बबनदादा विरकर यांच्या वतीने देण्यात आले.
तिसर्‍या क्रमांकाच्या कुस्तीत पै. महादेव माने याने पै.दिपक मोहिते वर पोकळ घिस्सा डावावर मात केली. त्यास एकेचाळीस हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. हे बक्षीस नितीन शेठ मगर व नितीन काटकर यांच्या वतीने देण्यात आले. चौथ्या क्रमांकाच्या कुस्ती पै. महेश विरकर विरुद्ध पै.ऋषीकेश भाले यांची बरोबरीत सोडवली . पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत पै. अमोल नरळे यांनी पै.कृष्णा नागवे यांच्यावर मात केली. सहाव्या क्रमांकाची कुस्ती पै. नाथा शेंबडे विरुद्ध पै. उदय दडस बरोबरीत सोडवली . सातव्या क्रमांकाची कुस्ती पै. राजेंद्र रुपनवर विरुद्ध पै. विजय वाघमोडे ही कुस्ती बरोबरीत सोडवली. याशिवाय या कुस्ती मैदानात अनेक कुस्त्या चटकदार झाल्याने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी सरपंच रमेश गायकवाड, अध्यक्ष सदाशिवराव गायकवाड, नितीन मगर, तुकाराम गायकवाड, गणेश गायकवाड, ज्ञानदेव गायकवाड, आण्णा गायकवाड, शेखर गायकवाड, शंकर गायकवाड, पोपट गायकवाड, दिग्वविजय गायकवाड, आकाश गायकवाड, शंकर मंडले, नितीन काटकर, आनंदा गायकवाड, ग्रामस्थांनी व यात्रा कमिटीने परिश्रम घेतले.
पंच म्हणून वस्ताद रावसाहेब मगर, वस्ताद शिवाजी दिडवाघ, सदाशिव गोरड, वस्ताद पोपट रुपनवर, वस्ताद महालिंग खांडेकर, वस्ताद गणेश गायकवाड, पै. सतीश दिडवाघ, पै. नवनाथ खांडेकर, विलास रूपनवर, रावसाहेब कोळपे, दिलीप दिडवाघ, राजू विरकर, यांनी काम पाहिले. यावेळी परशुराम पवार यांनी कुस्त्यांचे धावते समालोचन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular