Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीमहाबळेश्‍वर साईट सीनच्या दर्शनासाठी पर्यटकांची पहिली पसंती

महाबळेश्‍वर साईट सीनच्या दर्शनासाठी पर्यटकांची पहिली पसंती

सातारा : थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्‍वर परिसराला सध्या हिरव्या शालूने गुरफूटून घेतलेले आहे. सकाळचे धुके आणि गुलाबी थंडी यामुळे महाबळेश्‍वरला भेट देणार्‍या पर्यटकांची गर्दी वाढू लागलेली आहे. साईट सीनच्या दर्शनासाठी पर्यटकांची पहिली पसंती होत असून पर्यटकांना इच्छुक स्थळी पोहोचवण्यासाठी हॉटेल व्यवसायिकांची लगबग सुरु झालेली आहे.
पश्‍चिम महाराष्ट्रातील पाचगणी-महाबळेश्‍वर म्हणजे पर्यटकांसाठी ताजेतवाने होण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळे दरवर्षी 70 ते 80 हजार पर्यटक महाबळेश्‍वरला भेट देतात. उन्हाळ्यामध्ये पर्यटकांच्या गर्दीीमुळे दरवर्षी वाहतुकीची प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे काही पर्यटक नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीमध्ये या पर्यटनस्थळाला भेट देत असतात. विशेषत: पुणे, मुंबई, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, राजस्थान, दिल्ली व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. या पर्यटकांना चांगली सुविधा तसेच हॉटेलच्या आरक्षणासोबतच नाष्ट्याची व्यवस्था करुन पर्यटकांचा वेळ व पैसा वाचवण्याचे काम हॉटेल शाही पर्ल नेहमीच करतात अशी माहिती या हॉटेलचे मालक महेश सावंत व व्यवस्थापक अभिजीत मोरे, धनंजय शेट्टी यांनी दिलेली आहे.
पाचगणी-महाबळेश्‍वर रस्त्यावरील मेटगुताड येथे या हॉटेलमध्ये पर्यटकांना योग्य माहिती देवून त्यांचा आनंद वाढवत आहेत. महाबळेश्‍वर या ठिकाणी सह्याद्रिच्या कड्याकपार्‍यातील सूर्य दर्शन, ऐतिहासिक प्रतापगड किल्ला तसेच वेण्णा, कृष्णा, कोयना, सरस्वती या नद्यांच; उगमस्थान तसेच धार्मिक स्थळ तीर्थ क्षेत्रमहाबळेश्‍वर येथील प्राचीन मंदिर, व तापोळा येथील शिवसागर जलाशय, वेण्णालेक बोटींग या ठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात. सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पर्यटकांना महाबळेश्‍वर दर्शन घडवण्यासाठी खाजगी बसेस तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांना मनमुराद आनंद घेण्यासाठी इतर वाहनांची व्यवस्था करण्याचा त्रास सहन करावा लागत नाही असे पर्यटकांनी सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular