Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीनागेवाडी येथील क्रशरवर परप्रांतिय मजूराचा खून

नागेवाडी येथील क्रशरवर परप्रांतिय मजूराचा खून

मृताच्या डोक्याला गंभीर जखम, खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट
सातारा : नागेवाडी, ता. सातारा येथील क्रशरवर परंप्रांतिय मजूराचा खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी समोर आली. रामसुंदर सिंह ( वय 38 मूळ रा. रानाबिगाह पटना बिहार ) असे मृताचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप समोर आले नसले तरी संशयित म्हणून मृताचा भाचा कन्हैय्याचे नाव प्राथमिक पोलीस चौकशीत निष्पन्न झाले.
क्रशर मॅनेजर तानाजी शरद मोरे (वय -32) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामसुंदरसिंह हा परप्रांतिय मजूर विक्रम जाधव ( पाटण ) यांच्या क्रशरवर गेल्या काही महिन्यापासून कामाला होता. तर त्याचा भाचा कन्हैय्या जवळच्याच दुसर्‍या एका क्रशरवर कामाला होता. सायंकाळी मात्र दोघेही एकाच ठिकाणी मुक्कामाला असत . क्रशर मॅनेजर मोरे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता काम संपवून घरी गेले. सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर आले असता क्रेशर कार्यालयापासून पन्नास फूटावरील मोकळ्या मैदानात रामसुंदर सिंह याचे प्रेत आढळून आले . डोक्याच्या मागील बाजूस मोठी जखम होऊन त्यातून मोठा रक्तस्त्राव झाला होता. त्याचा भाचा कन्हैय्या तेथे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सातारा तालुक्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे फौजफाटयासह घटनास्थळी हजर झाले. तपासाच्या दृष्टीने मदत मिळण्याच्या अनुषंगाने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येऊन बॉडी पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयाकडे रवाना करण्यात आली. खुनाचे नक्की कारण स्पष्ट झालेले नाही. कन्हैय्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular