Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीकराडला प्रशासकीय इमारत उद्घाटनाचे वेध

कराडला प्रशासकीय इमारत उद्घाटनाचे वेध

प्रांत, तहसीलसह अन्य शासकीय कार्यालये एकाच छताखाली; नागरिकांची होणार सोय
कराड: विधानसभा निवडणूकीसाठी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचा वापर करण्यात आला. प्रशस्त इमारतीतून दोन विधानसभा मतदारसंघाच्या कामाची सूत्रे तेथून हलवता येणे शक्य झाले. मात्र, निवडणुका संपल्यान आता या इमारतीला उद्घाटनाबरोबरच प्रशासकीय कार्यालये सुरु होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. प्रांत, तहसीलसह अन्य शासकीय कार्यालये या एकाच इमारतीत येणार असल्याने लोकांची मोठी सोय होणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासकीय इमारतीच्या कामाला मंजुरी देत निधी मंजूर केला. त्यानंतर 2014 मध्ये या इमारतीच्या कामाचे भूमिपूजनही श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यांनतर राज्यात सत्तांतर होरुन भाजप व शिवसेना युती सत्तेत आली. गेल्या काही दिवसांपासून इमारतीचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र, निवडणुकीच्या धामधूमीमुळे त्याच्या उद्घाटकडे दुलक्ष झाल्याची स्थिती होती.
वास्तविक इमारतीचे काम पूर्ण होऊन अनेक दिवस झाले. मात्र फर्निचर व इलेक्ट्रिकल कामाची निविदा विलंबाने निघाल्याने काम लांबले गेल्याची चर्चा आहे. त्यातूनही इमारतीचे काम पूर्णत्वास आले. विधानसभा निवडणुकीचे कामकाज याच इमारतीतून करण्याची परवानगी घेत तेथून निवडणूक काम सुरु केले. त्यानुसार नव्याने होणार्‍या प्रांत कार्यालयात कराड दक्षिण विधानसभा व तहसील कार्यालयात कराड प्रांताधिकारी उत्तम दिघे हे कराड दक्षिणचे निवडणूक अधिकारी असल्याने व तहसीलदार अमरदीप वाकडे कराड उत्तरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असल्यामुळे उद्घाटनापूर्वीच दोघांनाही कक्षाचा ताबा घेण्याची संधी त्यानिमित्ताने मिळाली. सध्या निवडणुकीचे कामकाज संपले असले, तरी पूर्वीप्रमाणे जुन्या ठिकाणीच प्रांत व तहसील कार्यालयाचे कामकाज सुरु आहे. मात्र, निवडणुक काळात सुमारे महिनाभर या इमारतीत वावरलेल्या अधिकार्‍यांनाही जुन्या ठिकाणी मन रमणार नसल्याची स्थिती आहे. त्यामुळेच पूर्णत्वास आलेल्या इमारतीचे उद्घाटन होऊन प्रत्यक्षात कामाला केव्हाच मुहूर्त मिळणार याकडे शहरासह तालुक्याचे लक्षस लागुन आहे. या इमारतीत केवळ प्रांत व तहसील कार्यालय न राहता तेथे अन्य शासकीय कार्यालये आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंगची सुविधा असल्याने तालुक्यातील नागरिकांसाठी एकाच इमारतीत सर्व शासकीय कार्यालये सहजरीत्या उपलब्ध होणार आहेत.
मात्र, या इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त केव्हा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या सुरु असलेल्या सरकार स्थापनेच्या घोळानंतर या इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त निश्‍चित होण्याची शक्यता आहे.
तोपर्यंत काही कार्यांलयांनी जुन्या कार्यालयातील सामानांची हलवाहलव सुरु करुन ती नव्या कार्यालयात आणण्याचे काम सुरु झाल्याचेही समजते. त्यामुळे डिसेंबर पूर्वी की नव्या वर्षात नवीन इमारतीत शासकीय कार्यालयांचे स्थलांतर होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular