Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीत्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लखलखले श्री क्षेत्र महाबळेश्वर

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लखलखले श्री क्षेत्र महाबळेश्वर

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील महाबळेश्वर व पंचगंगा मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हजारो दिव्यांच्या तेजोमय प्रकाशाने मनामनात चैतन्य निर्माण होत होते.
महाबळेश्वर येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे परंपरेप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या साहाय्याने व पुणे येथील अलका व सतीश हेरेकर यांच्यावतीने महाबळेश्वर मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात दुपारी अभिषेकाने करण्यात आली याचे पौराहित्य येथील प्रमोद महाबळेश्वरकर यांनी केले.मंदिरामधील स्वयंभू शिवलिंगाला बेलाच्या पानांनी व आकर्षक रंगसंगती असलेल्या फुलांची अत्यंत आकर्षक सजावट डोळ्यांचे पारणे फेडणारी होती महाआरतीचा कार्यक्रम पार पडला.श्रीमती महानंदा वैती व शिवभक्त मधुकर वैती,मुंबई यांच्यातर्फे दरवर्षी पुष्प सजावट करण्यात येते.
सायंकाळी भाविकांनी दीपप्रज्वलित केले श्री पंचगंगा मंदिरात देखील श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामस्थांतर्फे दीपप्रज्वलीत करण्यात आले होते हा सोहळा पाहण्यासाठी सातारा पोलीस अधीक्षक डॉ तेजस्वी सातपुते,वाई प्रांताधिकारी संगीत राजापूरकर,उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके,तहसीलदार सुषमा पाटील,पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी आदींची उपस्थित होती हा दीपोत्सव पाहण्यासाठी महाबळेश्वर व परिसरातील भाविकांसह पर्यटकांनी गर्दी केली होती.
महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री क्षेत्रमहाबळेश्वर ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्ट चे देवेंद्र जगताप यांनी परिश्रम घेतले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular