सातारा : महाराष्ट्रात गेले दोन दशकांचे रखडलेले अनुकंपा संदर्भातील शासन व शैक्षणिक संस्था स्तरावरील अनुकंपा धारक उमेदवारांनी आज सातारा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथील आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालयात माथाडी कामगार नेते व अध्यक्ष ना, नरेंद्रपाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी सातारा सांगली रायगड व पुणे अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार अनुकंपा उमेदवारांना दिलासा देताना पाटील म्हणाले गेले अनेक वर्षे शासनाच्या व शैक्षणिक संस्थेच्या अनेक विभागातील अनुकंपा धारक संबंधित कार्यालयात व्यक्तिगत हेलपाटे मारून त्या कार्यालयांच्या अधिकारी व पदाधिकारी यांनी अनुकंपा धारकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून झिडकारले आहे.
असंघटित असणार्या अनुकंपा उमेदवारांनी संघटित होऊन व एक संघ राहून त्या अनुकंपा उमेदवारांच्या संघटितपणाने शासन स्तरावर अनुकंपा उमेदवारांच्या न्याय हक्कासाठी प्रशासनाकडून सर्वच विभागातील अनुकंपा उमेदवारांच्या हक्काच्या नोकरी संदर्भातील सर्व गार्हाणी शासनाकडे मांडून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला यश मिळाले नाही. प्रतीक्षा यादी वाढत आहे. अनुकंपा खाली भरती करणारच असून या संदर्भात न्याय मिळवुन देण्याची ग्वाही ना पाटील यांनी दिली
यावेळी अनुकंपा धारक संघटनेचे मार्गदर्शक चंद्रशेखर सावंत व मोहन जगताप यांच्या शिष्टमंडळाने ना पाटील यांची भेट घेऊन सातार्यात निवेदन सादर केले.यावेळी मोठ्या संख्येने अनुकंपा धारक उमेदवार उपस्थित होते.
अनुकंपा उमेदवारांच्या रिक्त पदभरतीबाबत शासन स्तरावर उचित कार्यवाही करू : ना. नरेंद्र पाटील
RELATED ARTICLES