पाचवड: वाई तालुक्यातील चिंधवली येथे युवकांनी लोकवस्तीत आलेली महाकाय मगर पकडली आहे. गेली तीन महिने चिंधवली पांचवड भुईंज येथील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
वाई तालुका वनविभागाचे अधिकारी महेश झांजूरने आणि त्यांच्या सहकार्यांनीअनेक रात्री मगर पकडण्यासाठी घालवल्या होत्या. अखेर मगरीचा शोध रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संपला. यामध्ये दहा फूट लांब आणि दोनशे किलो वजनाची मगर किसनवीर कारखाना नजीक चिंधवली रस्त्यावर असणार्या एकविरा देवीच्या डोहाजवळील मोरे वस्तीवर सापडली. ही मगर लोकवस्तीत येत असताना पहिल्यादा एका कुत्र्यांच्या नजरेत आली. त्यानंतर कुत्र्यांच्या जोरजोरात भुंकणाच्या आवाजाने सर्व युवक आणि ग्रामस्थ एकत्रित झाले. त्यानंतर सर्वानी दोरीच्या सहाय्याने मगरीला एका झाडास बाधून ठेवण्यात आले. त्यानंतर वाईच्या वनविभागास कळविले.
तालुका वन अधिकारी महेश झांजूरने आपल्या सहकारी टीमला घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि मगरीला ताब्यात घेतले. त्यानंतर मगरीला लांबच्या जंगलात सोडण्यात आले. यादरम्यान पकडलेल्या मगरीला पाहाण्यासाठी परिसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.
चिंधवलीतील युवकांनी पकडली महाकाय मगर
RELATED ARTICLES