म्हसवड : म्हसवडहून पंढरपूरकडे निघालेल्या स्विफ्ट कारला भाळवणी (ता.पंढरपूर) येथे झालेल्या अपघातात म्हसवड येथील अजिंक्य ढोले (वय 32) हा युवक जागीच ठार झाला तर इतर दोघे जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, म्हसवडहून पंढरपूरकडे अजिंक्य ढोले, मनोज भोजने व स्वप्नील टाकणे हे तिघे स्विफ्ट कार चक -02/ एक 4978 ने निघाले होते. अजिंक्य ढोले हा गाडी चालवित होता. स्विफ्ट कार भाळवणी (ता.पंढरपूर) जवळ असणार्या सुफली फाटा येथे असणार्या कॅनॉल च्या पुलावर असताना एक दुचाकीला वाचविण्याच्या नादात गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पुलावरून खाली कोसळली. या अपघातात अजिंक्य ढोले हा म्हसवड येथील युवक जागीच ठार झाला तर इतर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अजिंक्य ढोले याचे म्हसवड येथे मोबाईल शॉपी आहे तसेच सिद्धनाथ मंदिरामध्ये प्रसाद व इतर वस्तू विक्रीचे दुकान आहे. मनोज भोजने याचे म्हसवड येथेच इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे तर स्वप्नील टाकणे याचे मेडिकल आहे.
म्हसवड येथील श्री सिद्धनाथ रथोत्सव गुरुवार दि 27 नोव्हेंबर रोजी आहे. या यात्रेच्या खरेदीसाठी तिघे पंढरपूरला निघाली होती.पण जातानाच अपघात झाला व या अपघातात अजिंक्य ढोले हा जागीच ठार झाला तर दोघेजण जखमी झाले आहेत.
भाळवणीतील अपघातात म्हसवड येथील युवक ठार
RELATED ARTICLES