Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीपाटणकर प्राथमिक विद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पाटणकर प्राथमिक विद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पाटण : स्व. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त दि.14 नोव्हेंबर रोजी साजरा होणारा बालदिन येथील पाटणकर प्राथमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयातील नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा 2019 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून पंडित जवाहरलाल नेहरु यांचे लहान मुलांविषयी असलेली ओढ त्यांचे कार्य विशेध करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ, पत्रकार शंकरराव मोहिते, विद्या म्हासुर्णेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष घनश्याम मोरे, बाळासाहेब पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, मेडेल व रोख रक्कम देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
विद्यालयाचे शिक्षक गुरव सर यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मांडताना नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी सन 2016-17 मध्ये 5 विद्यार्थी, सन 2017-18 मध्ये 15 विद्यार्थी, सन 2018-19 मध्ये 18 विद्यार्थी असे 38 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये यश संपादन केले असल्याचे सांगितले. चालू वर्षी व सन 2019-20 मध्ये विद्यालयातील एकुण 64 विद्यार्थी नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेला बसले असल्याची माहिती दिली.
सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ व पत्रकार शंकरराव मोहिते यांनी नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेमध्ये यश प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याची घोषणा केली.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.संयोगिता धामणकर, शिक्षक विजय गुरव, पांडुरंग चव्हाण, जोत्सना भोळे, निकीता पवार, मनिषा वाडेकर व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकीता पवार यांनी केले. तर आभार पांडुरंग चव्हाण यांनी मानले

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular