वडूज : येथील हुतात्मा परशुराम विद्यालयातील सन 1997 च्या इयत्ता 10वी ब च्या माजी विद्यार्थ्यांनी 23 वर्षांनी स्नेह-मेळावा आयोजित केला होता. आणि या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी वर्गशिक्षक पी आर शिंदे, प्राचार्य शरद औटे, उपमुख्याध्यापक मिलिंद घार्गे, अंबादास भडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सन1997 सालचे दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
यावेळी प्रथम हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या स्नेह मेळाव्यास सुरवात झाली. सध्या प्रत्येक जण कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत याची चर्चा करण्यात आली.
दरम्यान यावेळी बोलताना त्यावेळेस असलेले वर्गशिक्षक श्री शिंदे म्हणाले विद्यालयाच्या शिस्तप्रिय वागवणुकीमुळे आज तुमच्या सारखे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झाले याचा मला अभिमान वाटतो. श्री शिंदे यांनी माजी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करत सर्व विद्यार्थ्यांनी 23 वर्षांनी स्नेहमेळावा आयोजित करुन जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.
बांधकाम व्यावसायिक बाबा फडतरे म्हणाले विविध क्षेत्रात काम करणार्या प्रत्येकाने एकमेकांच्या अडीअडचणी तसेच एकमेकांना मदतीसाठी नेहमी एकत्र यावे. आपल्यात एकोपा राहणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूयात.
पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण म्हणाले , मुलांनी आई वडिलांचा सांभाळ करावा . त्याच प्रमाणे मुलींनी ही आपल्या सासू सासर्याना आई वडिलांप्रमाणे वागणूक द्यावी. तसेच अनेक जणांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी जयवंत जाधव, किरण कुलकर्णी, राजू फडतरे, सचिन सजगणे, सागर म्हामने, अजय पवार, अजय यादव, प्रकाश खुडे, विनायक देशपांडे, सुरेश फडतरे, शरद बागल, मनीषा मोरे, विद्या शिंदे, निमा जाधव, वर्षा राणी, दीपाली मेहता, निलिमा राऊत, अर्चना कुचेकर, वर्षराणी महामुनी,जयश्री गोडसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबा फडतरे यांनी केले व आभार नितीन लंगडे यांनी मानले.
पंचवीस वषार्ंनी जुन्या आठवणीना दिला उजाळा
RELATED ARTICLES