रहिमतपूर: महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (बेघरवस्ती) रहिमतपूर येथे बालसभा व विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
प्रारंभी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शामराव खवळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
बालसभेचे अध्यक्षस्थान इयत्ता 3 री तील शुभम खवळे याने भूषविले. महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याची माहिती देणारी भाषणे कल्याणी कांबळे, अस्मिता केंगार, सोनम खवळे, दिपेश खवळे, हर्षद सोनावणे, सोहम जाधव, मिनाक्षी फाळके या विद्यार्थ्यांनी केली व उपस्थित सर्वांना सोप्या भाषेत स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचणारे, शोषितांच्या हक्कांसाठी, महिला सशक्तीकरणासाठी संघर्ष करणारे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रेरणादायक जीवन कार्याची माहीती दिली.
यावेळी महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त प्रश्नमंजुषा, पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.व प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना मयुरी तुपे यांच्या हस्ते बक्षिस देवून गौरविण्यात आले.
यावेळी शामराव खवळे, सागर चव्हाण, प्रविण घाडगे, मयुरी तुपे, सविता कुंभार, विदया खाडे, छाया पवार, मीना सावंत, रेश्मा सोनावणे, शोभा खवळे, शुंभागी खवळे, रोहित आवळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शिक्षक व सर्व सदस्य उपस्थित होते.
रहिमतपूरला महात्मा जोतिबा फुले स्मृतीदिना निमित्त बालसभेचे आयोजन
RELATED ARTICLES