Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीसायकलीचे महत्व पटवुन देण्यासाठी सायकल स्पर्धेचे आयोजन

सायकलीचे महत्व पटवुन देण्यासाठी सायकल स्पर्धेचे आयोजन

महाबळेश्‍वर: पर्यावरणाबरोबर सायकलीचे महत्व पटवुन देण्यासाठी सहयाद्रि क्लासिक पुणे व महाबळेश्‍वर हॉटेल ओनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने 30 तारखेस वाई पांचगणी महाबळेश्‍वर तापोळा किल्ले प्रतापगड मार्गे आड व पुन्हा महाबळेश्‍वर असे एकुन 200 किमी अंतर असलेली सायकल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत विदेशातील स्पर्धकांसह देशातील अनेक नामवंत पुरस्कार विजेती स्पर्धकासह 100 स्पर्धक भाग घेणार आहे.
या स्पर्धेची माहीती देण्यासाठी येथील हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष असिफ सयद व उपाध्यक्ष सुर्यकांत जाधव यांनी पत्रकार परीषद आयोजित केली होती.
यावेळी त्यांनी या स्पर्धेची माहीती दिली. सकाळी पहाटे पाच वाजता वाई येथील पसरणी घाटाच्या पायथ्याला असलेेेेेेेेेेेेल्या हॉटेल सनई येथुन या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. तर महाबळेश्‍वर येथील हॉटेल ग्रॅन्ड येथे सायंकाळी सात वाजता या स्पर्धेचा समारोप होणार आहे.व तेथेच या स्पर्धेचा मान्यवरांच्या उपस्थितीत पारीतोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे. या स्पर्धेचे खास वैशिष्टय म्हणेजे या स्पर्धेत स्पर्धकांना एकुन चार घाट पार करावे लागणार आहेत. यापैकी तापोळा घाट हो दोन वेळा तर अंबेनळी व पसरणी हे दोन घाट प्रत्येकी एकदा चढावा लागणार आहे. या स्पर्धेती पहिला टप्पा महाबळेश्‍वर येथील हॉटेल सेवाई येथे राहणार आहे. याच ठिकाणी स्पर्धकांना थोडावेळ थांबुन पाणी सरबत घेता येईल.अथवा सायकलींची देखभार दुरूस्ती करता येईल त्या नंतर तेथुन हेे स्पर्धक तापोळा येथे जावुन परत महाबळेश्‍वरला येतील व पुन्हा तापोळा येथे जावुन पुन्हा महाबळेश्‍वर येथे येतील याचा अर्थ स्पर्धकांना दोनवेळा तापोळयाला जावे लागेल त्या नंतर ते अंबेनळी घाटातुन पोलादपुर येथील आड गाव येथुन पुन्हा माघारी महाबळेश्‍वर येथे येतील व हॉटेल गॅ्रन्ड येथे समारोप होईल.
या स्पर्धेत जर्मनी इंग्लड व नॉर्वे येथील स्पर्धक भाग घेणार आहेत.तसेच बंगलोर येथील इंडियन नॅशनल चॅम्पियन नविन जॉन तसेरच मध्यप्रदेश येथील एशियन गेम मध्ये सातवा क्रमांक पटकाविलेले. अरविंद पनवारे हे देखिल या स्पर्धेत भाग घेणार असल्याची माहीती आयोजकांनी पत्रकारांना दिली.यंदा केवळ 100 स्पर्धकांनाच या स्पर्धेत भाग देण्यात आला आहे मात्र पुढील वर्षी या स्पर्धेत मोठया प्रमाणावर स्पर्धकांचा सहभाग असेल असेही हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी यांनी यावेळी सांगितले. यावेळी असोसिएशचे अध्यक्ष असिफ सययद सुर्यकांत शिंदे धारेन नागपाल व रोहीत कोमटी आदी मान्यवर उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular