म्हसवड: जांभूळणी (ता.माण) येथील श्री भोजलिंग देवाच्या रिंगावण यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती पै.भारत मदने विरुद्ध पै. संतोष दोरवड यांच्यात कुस्ती रंगली होती. कुस्ती बराच वेळ चालली पण दोन्ही पैलवानाची ताकद समान पडत असल्याने प्रत्येक वेळी डाव प्रतिडाव करत दोंघाचाही बचाव होत होता.
परंतु पै. भारत मदने यांच्या गुडघ्याला मार लागल्याने कुस्ती न खेळण्याचा निर्णय घेतला. अखेर पै. संतोष दोरवडला विजयी घोषित करण्यात आले. त्याला दोन लाख अकरा हजार रुपये इनाम देण्यात आले. ही कुस्ती माजी सभापती कै. खाशेराव जगताप (बापू) व माजी सभापती कै.वसंतराव जगताप (पिंटू दादा) यांच्या स्मरणार्थ श्री अभयसिंह जगताप व अँड. सिध्देश्वर काळेल यांच्या तर्फे लावण्यात आली होती.
दुसर्या क्रमांकाची कुस्ती पै. महारूद्र काळेल विरुद्ध पै.संदेश ठाकूर यांच्यात झाली. पै.संदेश ठाकूर यांने महारूद्र काळेलवर विजय मिळवला. त्याला एक लाख पंच्याहत्तर हजार रूपयाचे इनाम दिले. ही कुस्ती पोलीस पाटील सुभाष काळेल व बुधाजी काळेल यांच्या तर्फे लावण्यात आली होती. तिसर्या क्रमांकाची कुस्ती पै.रवी शेंडगे याने पै. दत्ता नरळे यांच्यावर मात केली. त्यास एक लाख 50 हजार रुपये इनाम देण्यात आले. ही कुस्ती सरपंच भारत काळेल व मारुती केंगार यांच्यातर्फे लावण्यात आली होती.
चौथ्या क्रमांकाची कुस्ती पै.प्रशांत शिंदे विरुद्ध पै. सचिन चव्हाण यांच्यात झाली. प्रशांत शिंदे यांनी सचिन चव्हाण वर मात केली. त्यास एक लाख पस्तीस हजार रुपयांचे इनाम देण्यात आले. ही कुस्ती इंजिनिअर जवाहर काळेल व कै. रघुनाथ नरळे यांच्या स्मरणार्थ श्री राजू नरळे यांच्या वतीने लावण्यात आली होती. पाचव्या क्रमांकांची कुस्ती पै. सतपाल सोनटक्के याने पै. निलेश तरंगे याला चितपट केले व एक लाख अकरा रुपये इनामाचा मानकरी ठरला. ही कुस्ती जिल्हा परिषद शाळा शिक्षक स्टाफ यांच्या वतीने देण्यात आहे.
सहाव्या क्रमांकांची कुस्ती पै. नाना खांडेकर याने पै. विनायक पाटील वर मात केली . एक लाख रूपयांचे इनाम देण्यात आले. हे इनाम पीएसआय समाधान केंगार व सागर लोंखडे यांच्या तर्फे लावण्यात होती , सातव्या क्रमांकाची कुस्ती पै. विशाल कोकरे विरुद्ध पै. बाळू बोडके यांची कुस्ती बरोबरीत सोडवली. ही 75 हजार रूपये इनामांची कै. कुडलिंक कोकरे यांच्या स्मरणार्थ विक्रम कोकरे व रघु कोकरे यांच्या तर्फे लावण्यात आली होती. आठव्या क्रमांकाची कुस्ती पै. बाळू भैरवाड याने पै. उमाजी चव्हाण याच्यावर मात केली. त्यास पंच्याहत्तर हजार इनामाची दादा काळेल व भाऊसो काळेल यांच्या वतीने देण्यात आले.
या मैदानात 50 रूपये ते 20 हजारापर्यतच्या अनेक चटकदार कुस्त्या झाल्या. अनेक स्थानिक पैलवानांच्या कुस्त्या झाल्या. यावेळी या मैदानात अनेक मान्यवरांच्या सह परिसरातील कूस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंच म्हणून वस्ताद रावसाहेब मगर, वस्ताद शिवाजी दिडवाघ, वस्ताद महालिंग खांडेकर, सत्यवान दिडवाघ, वस्ताद पोपट रुपनवर, सुभाष काटकर, नवनाथ खांडेकर, किरण पोळ, दिलीप विरकर, धनाजी कदम, हिराप्पा झिमल, अर्जुन पाटील, धनाजी बोडरे यांनी काम पाहिले. ही कुस्ती मैदान गाजविण्यासाठी परशुराम पवार यांनी धावते समालोचन केले.
जांभूळणी येथील कुस्ती मैदानात पै. संतोष दोरवड विजेता
RELATED ARTICLES